मुख्यपृष्ठ / पाककृती / कॅलझोने पॉकेट

Photo of Calzone pocket by Aarti Nijapkar at BetterButter
1187
5
0.0(0)
0

कॅलझोने पॉकेट

Apr-06-2018
Aarti Nijapkar
35 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कॅलझोने पॉकेट कृती बद्दल

कॅलझोने पॉकेट खाण्यासाठी आपल्याला नेहमी बाहेर जावे लागते पण आता बाहेर जाण्यापेक्षा आपण घरीच बनवले तर ..… आणि तेही पौष्टिक घरच्याघरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इटालियन
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कॅलझोन पॉकेट बनविण्यासाठी
  2. मैदा १ वाटी
  3. मीठ १/२ लहान चमचा
  4. यीस्ट १/४ लहान चमचा
  5. साखर १/४ लहान चमचा
  6. पाणी गरजेप्रमाणे
  7. मिक्स व्हर्ब्स १/४ लहान चमचा
  8. भरणासाठी
  9. मशरूम १/२ वाटी
  10. ब्रोकोली ४ ते ५
  11. गाजर १ लहान
  12. चीझ १/३ वाटी
  13. काळीमिरी पावडर १/२ लहान चमचा
  14. बेसिल पाने ३ ते ४

सूचना

  1. प्रथम आपण पॉकेट बनऊयात
  2. ओव्हन १८०* से वर गरम करत ठेवा
  3. एका बाउल मध्ये मैदा, साखर , मीठ , यीस्ट ,तेल सर्व एकत्र करून घ्या मग थोडं थोडं पाणी घालून चांगलं मळून घ्या
  4. पीठ जास्त जाड व मऊ करू नये थोडक्यात आपण पिझ्झा बेस घरी बनवतो त्याच प्रकारे आपल्याला बनवायचे आहेत १० मिनिटे पीठ झाकून ठेवा
  5. आता भरणासाठी
  6. मशरूम व ब्रोकोलो मिठाच्या पाण्यात ब्लाँच करून घ्या
  7. एका पण मध्ये ऑलिव्ह तेल किंवा आपल्या रोजच्या वापरायचे तेल घाला
  8. मशरूम , ब्रोकोली व गाजर हे परतवून घ्या मग काळीमिरी पावडर , बेसिल ची पाने चिरून घाला थोडंस मीठ घाला व मिक्स हर्ब्स घालून पुन्हा परतवून घ्या
  9. आता तयार पीठ घ्या त्याला मध्यम जाडीत लाटून घ्या दुधाचा ग्रीसिंग करा त्यावर थोडं हर्ब्स व काळीमिरी पावडर परवून घ्या त्याचे चौकोनी कापा व त्यात मिश्रण भरा फोर्क ने बाजूने दाबून घ्या
  10. प्रत्येकी पॉकेट तयार करा पुन्हा ५ मिनिटे ठेवून द्या प्रूविंग साठी
  11. तयार पॉकेट वर दुधाचं ग्रीसिंग करून घ्या बेकिंग ट्रे वर ठेवा ओव्हन मध्ये १८०* से ८ ते १० मिनिटे बेक करून घ्या
  12. गरमागरम कॅलझोन पॉकेट तयार आहे सॉस सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर