Photo of BUTTER CHICKEN by Shradha Uttekar at BetterButter
1885
10
0.0(2)
0

BUTTER CHICKEN

Apr-08-2018
Shradha Uttekar
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • किड्स रेसिपीज

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकन अर्धा किलो
  2. दही 2 मोठे चमचे
  3. मीठ 1 चमचा
  4. खाण्याचा केसरी रंग अगदी थोडा
  5. आलं-लसूण पेस्ट 1 छोटा चमचा
  6. लाल तिखट पावडर 1 छोटा चमचा
  7. जीरा पावडर 1 छोटा चमचा
  8. साखर 1 छोटा चमचा
  9. एवरेस्ट चिकन मसाला 2 छोटे चमचे
  10. कांदा 1 मोठा
  11. टोमॅटो 1 मोठा
  12. काजू 15 ते 20
  13. बटर 1 मोठा चमचा
  14. आवश्यकतेनुसार थोडे गरम पाणी
  15. कोळश्याचा 1 लहान तुकडा
  16. तेल 1 मोठा चमचा
  17. सजावटीसाठी कांदा ,टोमॅटो आणि थोडी मलई

सूचना

  1. 1. प्रथम चिकन स्वच्छ पाण्यात चांगले धूवून घ्यावे
  2. 2. नंतर चिकनमध्ये दही ,जीरे पावडर, लाल तिखट पावडर, आलं-लसूण पेस्ट आणि मीठ टाकावे छान एकजीव करावे व पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवावे
  3. 3. पंधरा मिनिटांनी कुकरमध्ये तेल तापवावे आणि चिकन त्यामध्ये टाकावे व 4 शिट्ट्या करून शिजवून घ्यावे
  4. 4. कांदा-टोमॅटो सुद्धा मिक्सरवर बारीक करून ठेवावे
  5. 5. कढईमध्ये बटर गरम करून घ्यावे आणि त्यामध्ये काजू पावडर छान परतून घ्यावी
  6. 6. यामध्ये कांदा टोमॅटो पेस्ट टाकावी आणि छानपैकी शिजवून घ्यावी
  7. 7. नंतर खाण्याचा केशरी रंग यामध्ये टाकावा
  8. 8. नंतर एवरेस्ट चिकन मसाला यामध्ये टाकून एकजीव करावे
  9. 9. मग यामध्ये शिजवून ठेवलेले चिकन टाकावे आणि मस्त मिक्स करावे
  10. 10. आवश्यकतेनुसार यामध्ये गरम पाणी आणि साखर टाकावी
  11. 11. शेवटी गॅसवर एक लहान कोळश्याचा तुकडा कडक गरम करून घ्यावा आणि बटर चिकन मध्ये बरोबर मधोमध एक स्टिलची वाटी ठेवावी त्या वाटीमध्ये गरम कोळसा ठेवावा आणि लगेच थोडे तेल त्यावर टाकावे आणि कढई पाच मिनिटांसाठी झाकून ठेवावी
  12. 12. गरमागरम ढाबा स्टाईल बटर चिकन तयार यावर मलई टाकून कांदा टोमॅटोने सजवून वाढावे

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Prashant Pawar
Apr-11-2018
Prashant Pawar   Apr-11-2018

Very Good So nice

Ashish Uttekar
Apr-10-2018
Ashish Uttekar   Apr-10-2018

Superb....

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर