एगलेस बनाना मफिन्स | Eggless banana muffins Recipe in Marathi

प्रेषक Sudha Kunkalienkar  |  9th Apr 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Eggless banana muffins by Sudha Kunkalienkar at BetterButter
एगलेस बनाना मफिन्सby Sudha Kunkalienkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

1

एगलेस बनाना मफिन्स recipe

एगलेस बनाना मफिन्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Eggless banana muffins Recipe in Marathi )

 • कणिक १ कप
 • पिकलेली केळी ३ मध्यम आकाराची
 • साखर १/३ कप
 • तूप / तेल पाव कप
 • बेकिंग पावडर पाऊण चमचा
 • बेकिंग सोडा अर्धा चमचा
 • दालचिनी पूड पाव चमचा
 • मीठ चिमूटभर
 • दूध १-३ मोठे चमचे गरज पडल्यास
 • सुके मेवे आवडीनुसार

एगलेस बनाना मफिन्स | How to make Eggless banana muffins Recipe in Marathi

 1. एका बाउल मध्ये केळी सोलून मॅश करून घ्या. 
 2. त्यात साखर आणि तूप/तेल घालून चांगलं एकत्र करून घ्या . 
 3. दुसऱ्या बाउल मध्ये कणिक, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा , मीठ आणि दालचिनी पूड एकत्र करून घ्या
 4. कणकेच्या बाउल मध्ये केळ्याचे मिश्रण घाला आणि एकत्र करा. जास्त फेटू नका. 
 5. मिश्रण फार घट्ट असेल तर थोडे दूध घालून मिक्स करा.  
 6. ओव्हन १९० डिग्री वर गरम करून घ्या. 
 7. मफिन साच्या  ना तूप लावून त्यात मोठ्या चमच्याने मिश्रण घाला. पाऊण साचा भरेल एवढं मिश्रण घाला. वर सुके मेवे घाला.
 8. ओव्हन मध्ये १९० डिग्री वर ३०-३५ मिनिटं बेक करा.
 9. गरमागरम बनाना मफिन्स कॉफी बरोबर सर्व्ह करा. 

My Tip:

ब्राउन शुगर घालून मफिन्स जास्त छान लागतात

Reviews for Eggless banana muffins Recipe in Marathi (1)

tejswini dhopte2 years ago

Mstc
Reply