मुख्यपृष्ठ / पाककृती / Eggless banana muffins

Photo of Eggless banana muffins by Sudha Kunkalienkar at BetterButter
11
6
5(1)
0

Eggless banana muffins

Apr-09-2018
Sudha Kunkalienkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किटी पार्टी
  • युरोपिअन
  • ब्लेंडींग
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कणिक १ कप
  2. पिकलेली केळी ३ मध्यम आकाराची
  3. साखर १/३ कप
  4. तूप / तेल पाव कप
  5. बेकिंग पावडर पाऊण चमचा
  6. बेकिंग सोडा अर्धा चमचा
  7. दालचिनी पूड पाव चमचा
  8. मीठ चिमूटभर
  9. दूध १-३ मोठे चमचे गरज पडल्यास
  10. सुके मेवे आवडीनुसार

सूचना

  1. एका बाउल मध्ये केळी सोलून मॅश करून घ्या. 
  2. त्यात साखर आणि तूप/तेल घालून चांगलं एकत्र करून घ्या . 
  3. दुसऱ्या बाउल मध्ये कणिक, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा , मीठ आणि दालचिनी पूड एकत्र करून घ्या
  4. कणकेच्या बाउल मध्ये केळ्याचे मिश्रण घाला आणि एकत्र करा. जास्त फेटू नका. 
  5. मिश्रण फार घट्ट असेल तर थोडे दूध घालून मिक्स करा.  
  6. ओव्हन १९० डिग्री वर गरम करून घ्या. 
  7. मफिन साच्या  ना तूप लावून त्यात मोठ्या चमच्याने मिश्रण घाला. पाऊण साचा भरेल एवढं मिश्रण घाला. वर सुके मेवे घाला.
  8. ओव्हन मध्ये १९० डिग्री वर ३०-३५ मिनिटं बेक करा.
  9. गरमागरम बनाना मफिन्स कॉफी बरोबर सर्व्ह करा. 

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Apr-09-2018
tejswini dhopte   Apr-09-2018

Mstc

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर