मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेली कारली

Photo of Stuff karela by Teesha Vanikar at BetterButter
316
7
0.0(0)
0

भरलेली कारली

Apr-09-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेली कारली कृती बद्दल

कारल्यात खुप औषधीय गुण असतात, मी ज्या पध्दतीने ही कारली बनवली आहेत ते खाल्ल्यावर अजिबात कडु लागत नाहीत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ५ ते ६ छोटी कारली
  2. ३ चमचे बेसन
  3. १ चमचा दाण्याचा कुट
  4. १ चमचा आलं लसुण पेस्ट
  5. १ टी.स्पु लाल तिखट
  6. १ टी.स्पु गरम मसाला
  7. १/२ चमचा हळद
  8. २ चमचे किसलेला गुळ
  9. थोडीशी कोथिंम्बिर आणि कसुरी मेथी
  10. चविनुसार मिठ
  11. तेल

सूचना

  1. कारली धुवून मध्ये चिरा देवुन चमच्याने आतुन साफ करुन घ्या
  2. कुकरमध्ये थोडं मिठ टाकुन त्यात कारली घालावित व ऐक शिट्टी झाल्यावर गँस बंद करावा
  3. कारली थंड होण्यास कुकरमधुन काढुन घ्यावीत
  4. तोवर कढईत बेसन खमंग भाजुन घ्यावे
  5. बेसन थंड झाल्यावर त्यात सर्व मसाले,दाण्याचा कुट घालावा
  6. कोथिंम्बिर ,कसुरी मेथी व आलं लसुन पेस्ट घालुन सर्व मसाला मिक्स करावा
  7. मसाल्यात थोंड तेल घालुन मिश्रण पुन्हा मिक्स करावे
  8. तयार मसाला आता कारल्यात भरुन कारली टुथपिकने लॉक करावी
  9. पँनमध्ये तेल टाकुन कारली दोन्ही साईडने फ्राय करावी
  10. भरली कारली रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर