मुख्यपृष्ठ / पाककृती / पडवळाचा काचरा

Photo of Snakegourd slices vegi by Manasvi Pawar at BetterButter
545
5
0.0(0)
0

पडवळाचा काचरा

Apr-10-2018
Manasvi Pawar
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पडवळाचा काचरा कृती बद्दल

पाच भाज्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो पडवळ
  2. एक मोठा कांदा बारीक चिरून
  3. फोडणीसाठी तेल
  4. मोहरी
  5. हिंग
  6. ४-५ कडीपत्ता पाने
  7. पाव चमचा हळद
  8. ४-५ हिरव्या मिरच्या मध्यम चिरलेल्या
  9. दोन मोठे चमचे किसलेले ओलं खोबरं
  10. बारीक मीठ चवीनुसार
  11. थोड जाड मीठ

सूचना

  1. प्रथम पडवळ मध्ये चिरून घेऊन आतील बिया काढून टाकाव्यात
  2. आता पडवळाचे अर्ध गोलाकार पातळ काप करून घ्यावेत
  3. जाडे मीठ घालून ते चुरून घ्यावेत
  4. मीठाचे पाणी काढून टाकून भाजी २-३ वेळा धुऊन घ्या
  5. फोडणीसाठी एक भांड तापत ठेवा
  6. तेल तापले की त्यात मोहरी हिंग कढीपत्ता घालून परतावे
  7. हिरव्या मिरच्या घालून कांदा पण घालाव चांगला परतावा
  8. आता थोडी हळद घालावी
  9. पडवळ घालताना पुन्हा एकदा पिळून घ्यावे
  10. आणि व्यवस्थित परतावे
  11. झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी
  12. आता यामध्ये थोडं मीठ घालावं आणि ओलं खोबरं घालून पुन्हा एकदा वाफ येऊ द्यावी
  13. भाजी शिजली की तयार आहे आपला पडवळाचा काचरा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर