मुख्यपृष्ठ / पाककृती / Ghosale/ Gilka/ Green Sponge Gourd Bharata

Photo of Ghosale/ Gilka/ Green Sponge Gourd Bharata by Purva Sawant at BetterButter
2222
6
0.0(1)
0

Ghosale/ Gilka/ Green Sponge Gourd Bharata

Apr-10-2018
Purva Sawant
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Ghosale/ Gilka/ Green Sponge Gourd Bharata कृती बद्दल

घोसाळ्याचं भरीत करण्याची पद्धत वांग्याच्या भरीतापेक्षा खूप वेगळी आहे, पण त्याच्यासारखाच अतिशय चविष्ट आणि खमंग लागतं.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. घोसाळे - ३
  2. कांदा, बारीक चिरून - १ कप
  3. कोथिंबीर, बारीक चिरून- मुठभर
  4. हिरवी मिरची, तुकडे करून- ३ ते ४
  5. मोहरी- १ टीस्पून
  6. हळद- १/२  टीस्पून 
  7. हिंग- १/२  टीस्पून 
  8. तेल- ३ ते ४ टेबलस्पून 
  9. मीठ- चवीनुसार
  10. गुळ- चिमूटभर किंवा आवडीनुसार
  11. चिंच- बोराएवढी 

सूचना

  1. चिंच आणि गुळ एकत्र करून त्याचा घट्ट कोळ बनवा
  2. घोसाळी धुवून घ्या आणि त्याच्या सालीचा खरखरीत भाग खरडून काढा. बटाट्यासारखी त्याची साले काढू नका. घॊसळी कवळी असतील तर सालं खरडायाची पण गरज नाही. 
  3. बटाट्याच्या काचऱ्या करतो तश्या काचऱ्या करा. 
  4. जाड बुडाची कढई घ्या. मी भाकरीसाठी वापरला जाणारा खोलगट लोखंडी तवा वापरते. या तव्यामुळे घोसाळे छान खमंग परतले जाते.  
  5. तवा/कढई गरम करून त्यात तेल गरम करा. मोहरी टाका, ती तडतडली कि त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून खमंग परता. 
  6. त्यावर हळद हिंग घालून  जरासं परता.
  7. घोसाळ्याच्या काचऱ्या टाका आणि परता. 
  8. मीठ टाकून मिक्स करून घ्या आणि परतत रहा जोपर्यन्त घोसाळ्याला सुटलेले पाणी आटुन त्याचा लगदा तयार होईल आणि तेल सुटू लागेल.
  9. हा शिजलेला घोसाळ्याचा लगदा एका बाउल मध्ये काढून घ्या. (लोखंडी भांडे असेल तर लगेच काढायला हवा नाहीतर त्याचा एक विशिष्ट वास भाजीला येतो.)
  10. थंड झाल्यावर त्यात चिरलेला कांदा व कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ टाकून मिक्स करा. भरीत तयार आहे.  
  11. हे भरीत गरमागरम भाकरीसोबत अतिशय रुचकर लागत.  

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nutan Sawant
Apr-10-2018
Nutan Sawant   Apr-10-2018

मस्त,मस्तच!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर