मुख्यपृष्ठ / पाककृती / भोपळी मिरची कटलेट

Photo of Bhopli Mirchi Cutlet by Aarti Nijapkar at BetterButter
995
12
0.0(0)
0

भोपळी मिरची कटलेट

Apr-10-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भोपळी मिरची कटलेट कृती बद्दल

भोपळी मिरची कटलेट काही पौष्टिक भाज्या वापरून ही चविष्ट कटलेट बनवली आहेत चला तर पाहूयात साहित्य व कृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भोपळी मिरची बारीक चिरलेली २ मोठी
  2. उकडलेले बटाटा १ मध्यम
  3. दुधी भोपळा १/४ वाटी
  4. गाजर बारीक चिरलेले १/३ वाटी
  5. बीट बारीक कापलेले १/४ वाटी
  6. कोथिंबीर १ मोठा चमचा
  7. हिरवी मिरची १
  8. मीठ चवीनुसार
  9. गरम मसाला १ लहान चमचा
  10. लाल तिखट १ लहान चमचा
  11. हळद किंचित
  12. कोर्न फ्लोअर १ मोठा चमचा
  13. ब्रेड क्रम्ब २ मोठे चमचे
  14. तेल तवा फ्राय साठी

सूचना

  1. सर्व कापलेल्या भाज्या कोथिंबीर व हिरवी मिरची व उकडलेला बटाटा घ्या
  2. आता सर्व एकत्र करून घ्या बटाटा कुस्करून घ्या
  3. मग त्यात सर्व मसाले घाला चवीनुसार मीठ , कोर्न फ्लोअर व ब्रेड क्रम्ब घालून मिश्रण एकजीव करून घ्या
  4. मग मध्यम मिश्रण घेऊन दाबून कटलेट चा आकार द्या व ब्रेड क्रम्ब मध्ये घोळवून घ्या सर्व बाजुंनी लावून घ्या अश्या प्रकारे सर्व कटलेट तयार करून घ्या
  5. ताव तापवून त्यावर थोड तेल पसरवून घ्या अगदी कमी तेल मग कटलेट मध्यम आचेवर भाजून घ्या
  6. दोन्ही बाजूने सोनेरी रंग व कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या
  7. छान कुरकुरीत होतील असे भाजून घ्या
  8. गरमागरम भोपळी मिरची कटलेट तयार आहे सॉस सोबत किंवा चटणी सोबत खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर