मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा कांदा पात मिक्स भाजी

Photo of BATATA kanda paat mix bhaji by Chayya Bari at BetterButter
2406
5
0.0(0)
0

बटाटा कांदा पात मिक्स भाजी

Apr-10-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा कांदा पात मिक्स भाजी कृती बद्दल

बटाटा कांदा पात एकत्र भाजी चवीला अप्रतिम वाळलेल्या कांद्याऐवजी पात वापरून ताजी चव येते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कांदा पात बारीक चिरलेली २वाट्या
  2. बटाटे उकडलेले २ मोठे
  3. हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट २चमचे
  4. जिरे,मोहरी,हळद,हिंग,कढीपत्ता फोडणीसाठी
  5. सुक्या लाल मिरच्या २
  6. शेंगदाणे कूट ४चमचे
  7. हळद१चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल फोडणीसाठी २चमचे किंवा कमी
  10. लसूण पाकळी ३,४वरून

सूचना

  1. प्रथम उकडलेला बटाटा सोलून कापून घ्यावा
  2. कांदापात कापून धुवून घ्यावी व पाटील कांदा असेल तर तो कापावा व फोडणीची तयारी करावी
  3. तेल तापवून जिरे,मोहरी,हिंग कढीपत्ता टाकला मग कांदा परतला लाल मिरचीचे तुकडे व हिरवी मिरची आले लसूण पेस्ट टाकून परतून घेतली
  4. आता मीठ,हळद टाकले व शेंगदाण्याचा कूट घातला व कांदा पात,बटाटा घालून मिक्स केले
  5. गॅस बारीक करून झाकण घालून वाफ घेतली भाजी तयार
  6. वाढताना वर लसूण पाकळ्या तळून घालाव्या गरम भाकरी,पोळी किंवा पुरीबरोबरही छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर