मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या मसाला शेंगा

Photo of Masala Drumstick by Anuradha Kuvalekar at BetterButter
611
3
0.0(0)
0

शेवग्याच्या मसाला शेंगा

Apr-12-2018
Anuradha Kuvalekar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या मसाला शेंगा कृती बद्दल

शेवग्याच्या शेंगांची आमटी, पिठलं किंवा एखाद्या रसभाजीत शेवग्याच्या शेंगा घालतो. मी आज मसाला भाजीची रेसिपी देत आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ३-४ शेवग्याच्या शेंगा तुकडे करून
  2. १ वाटी खोवलेला ओला नारळ
  3. १ वाटी बारीक चिरलेला कांदा
  4. १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. १ चमचा लाल तिखट
  6. १ चमचा धने पावडर
  7. २ टी स्पून गोडा मसाला
  8. १ टी स्पून साखर
  9. हिंग, मोहरी, हळद, तेल फोडणीसाठी
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. शेंगांचे तुकडे करून वरील सालं काढून शेंगा गरम पाण्यात शिजवून घ्या.
  2. एका कढईत १/४ वाटी तेल तापवा. तेल तापले की, त्यात थोडी मोहरी, हिंग, हळद घाला. त्यात चिरलेला कांदा परतून घ्या. नंतर त्यात खरवडलेला नारळ, चिरलेली कोथिंबीर, गोडा मसाला, लाल तिखट, धने पावडर, मीठ, साखर घालून परता.
  3. शिजवलेल्या शेंगांचे तुकडे घालून भाजी हलक्या हाताने ढवळा व मध्यम आंचेवर २-३ मिनिटे झाकण ठेवून भाजी वाफवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर