वडा ऊसळ | Vada usal Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  12th Apr 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Vada usal by Teesha Vanikar at BetterButter
वडा ऊसळby Teesha Vanikar
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

7

0

वडा ऊसळ recipe

वडा ऊसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vada usal Recipe in Marathi )

 • निंबु
 • पाव
 • फरसाण
 • कोथिंम्बिर
 • १ चमचा जीरे
 • १/२ हळद
 • २ चमचे गरम मसाला
 • ३ चमचे लाल तिखट
 • ७ लसुन पाकळ्या
 • १ मोठा टोमँटो जाड कापलेला
 • २ कांदे जाड कापलेले
 • १ कप मोड आलेली मटकी
 • ऊसळसाठी-
 • तळायला तेल
 • १कप बेसन
 • वड्यासाठी -बटाट्याची पिवळी भाजी

वडा ऊसळ | How to make Vada usal Recipe in Marathi

 1. बटाट्याची पिवळी भाजी स्मँशरने स्मँश करुन घेतली
 2. बेसन पिठात मिठ व पाणी व बेकिंग सोडा घालुन पिठ भिजवुन घेतले
 3. तेल गरम झाल्यावर त्यात बटाटे वडे करुन तळुन घेतले
 4. कुकरमध्ये २ चमचे तेल घालुन धुतलेली मटकी १ कप पाणी टाकुन शिजवुन घेतली
 5. कांदा,लसुन गुलाबी भाजुन टोमँटोसकट बारीक वाटुन घेतली
 6. कढईत ३ पळी तेल टाकुन वाटण घातले
 7. वाटणातच लाल तिखट हळद,गरम मसाला व मीठ घालुन तेल सुटेपर्यन्त मसाला परतुन घेतला
 8. मसाल्यात शिजवलेली मटकी व १ ग्लास पाणी टाकुन ३ मी. ऊसळ शीजवुन गँस बंद केला
 9. सर्व्हीगं बाऊलमध्ये ऊसळ घेवुन त्यावर बटाटे वडा ठेवला, बाजुला फरसाण,पाव,कापलेला कांदा,निंबु घेवुन वडा ऊसळ रेडी
 10. तेल गरम

My Tip:

वाटण न करता कांदा टोमँटो बारीक कापुन जरी फोडणी केली तरी ऊसळ खुप छान लागते

Reviews for Vada usal Recipe in Marathi (0)