दुधीचे कोफ्ते | Lauki Kofte Recipe in Marathi

प्रेषक sapana behl  |  13th Apr 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Lauki Kofte by sapana behl at BetterButter
दुधीचे कोफ्ते by sapana behl
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3861

0

दुधीचे कोफ्ते recipe

दुधीचे कोफ्ते बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Lauki Kofte Recipe in Marathi )

 • कोफ्ते बनविण्यासाठी : 250 ग्रॅम्स किसलेली दुधी
 • 2 मोठे चमचे कॉर्न फ्लोर
 • 2 मोठे चमचे चण्याचे पीठ/बेसन
 • 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • 1/4 वाटी चिरलेली कोथिंबीर
 • 1 लहान चमचा जिरे
 • 1 लहान चमचा गरम मसाला
 • मीठ स्वादानुसार
 • 1 लहान चमचा लाल तिखट
 • पेस्ट बनविण्यासाठी : 2 कांदे चिरलेले, 5-6 चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • 2 कप टोमॅटोचा रस
 • 1 लहान चमचा कसुरी मेथी
 • 1 लहान चमचा जिरे
 • 1 लहान चमचा धणेपूड
 • 1 लहान चमचा हळद पूड
 • 1 लहान चमचा गरम मसाला
 • 1 लहान चमचा लाल तिखट
 • मीठ स्वादानुसार
 • तळण्यासाठी खाण्याचे तेल
 • अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
 • 5 कप पाणी किंवा आवश्यकतेनुसार

दुधीचे कोफ्ते | How to make Lauki Kofte Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात कोफ्त्यासाठी लागणारे सर्व घटक एकत्र करा. एकसारख्या आकाराचे लहान गोळे करा. कढईत तेल गरम करा, त्यात कोफ्ते दोन्ही बाजूंनी तळून घ्या.
 2. पेपर रुमालावर काढा किंवा बाजूला काढून ठेवा. थोडे पाणी घालून कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या यांची फूड प्रोसेसरमध्ये पेस्ट तयार करा.
 3. कोफ्ते तळण्यासाठी वापरलेल्या कढईत दोन चमचे तेल ठेवून बाकीचे तेल काढून घ्या. त्या तेलात कसुरी मेथी आणि जिरे घालून 1 मिनिटे परता.
 4. आता यात कांदा-लसूण-हिरव्या मिरचीची पेस्ट आणि सुके मसाले आणि मीठ घालून मिश्रण चांगले हलवा.
 5. आता यात टोमॅटोचा रस घाला आणि तेल कडा सोडेपर्यंत परता. थोडे पाणी घाला आणि थोड्या वेळासाठी उकळवा. आता या करीमध्ये अगोदर बनविलेले कोफ्ते घाला आणि थोडा वेळ शिजवा.
 6. वाढा आणि आनंद घ्या.
 7. वर बनविलेली पेस्ट घाला आणि 10-15 मिनिटे मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत परता.

Reviews for Lauki Kofte Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo