मुख्यपृष्ठ / पाककृती / हक्का नूडल्स

Photo of Hakka noodles by Manasvi Pawar at BetterButter
465
5
0.0(0)
0

हक्का नूडल्स

Apr-15-2018
Manasvi Pawar
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हक्का नूडल्स कृती बद्दल

पाच भाज्या

रेसपी टैग

  • मॅगी
  • व्हेज
  • चायनीज

साहित्य सर्विंग: 5

  1. एक पैकट नूडल्स
  2. चार चमचे हक्का नूडल्स मसाला
  3. अर्धी वाटी चिरलेला कोबी
  4. एक वाटी फरसबी गाजर आणि सिमला मिरची मिक्स कापून घेतलेल
  5. दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला
  6. आलं बारीक चिरून
  7. लसणाच्या चार-पाच पाकळ्या चिरून
  8. कांद्याची पात पाव वाटी चिरलेली
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. एका मोठ्या पातेल्यात आठ-दहा कप पाणी उकळत ठेवावे
  2. उकळी आली की त्यात तोडून किंवा अख्खा आपल्याला हवे तसे नुडल्स टाकाव्यात
  3. नूडल्स शिजून झाल्या की त्या एका चाळणीत काढून थंड पाण्याखाली धुऊन घ्या आणि थोडं तेल घालून एकत्र करावे
  4. आता एका पैनमध्ये दोन चमचे तेल गरम करावे आणि त्यामध्ये चिरलेले लसूण, आलं आणि मिरची घालून छान परतून घ्यावे
  5. आता यामध्ये चिरलेला कोबी आणि इतर उकडून घेतलेल्या भाजल्या ( फरसबी, गाजर सिमला मिरची) घालून पुन्हा शिजवावे
  6. आता यामध्ये नूडल्स घालून परतावे आणि नूडल्स मसाला घालून थोडे मीठ पण घालावे
  7. सगळ्यात शेवटी चिरलेली कांद्याची पात घालून एक वाफ येऊ द्यावी
  8. तयार आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या हक्का नूडल्स

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर