मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाचे लाडू

Photo of Moong Laadu by Sudha Kunkalienkar at BetterButter
707
1
0.0(0)
0

मुगाचे लाडू

Apr-17-2018
Sudha Kunkalienkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाचे लाडू कृती बद्दल

अख्ख्या मुगाचे पीठ वापरून बनवलेले हे लाडू खूप खमंग लागतात आणि पौष्टिक ही असतात. मी ह्यात मध घालते त्यामुळे तूप आणि साखर कमी लागते. गूळ जास्त घालून साखर अगदी कमी घालते. फक्त गुळाचे लाडू कडक होतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. मुगाचं पीठ २ कप
  2. बारीक चिरलेला गूळ पाऊण कप
  3. पिठीसाखर अर्धा कप
  4. मध ४ मोठे चमचे
  5. तूप अर्धा कप अंदाजे
  6. काजू चे तुकडे २ मोठे चमचे
  7. वेलचीपूड पाव चमचा
  8. दूध १ मोठा चमचा

सूचना

  1. एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप आणि मुगाचे पीठ घाला. मध्यम आचेवर लालसर रंगावर खमंग भाजून घ्या. सारखे ढवळत रहा म्हणजे पीठ जळणार नाही.
  2. गॅस बंद करून पिठात दूध घाला आणि लगेच मिक्स करा. बुडबुडे यायचे बंद होईपर्यंत ढवळत रहा. 
  3. पीठ एका पातेल्यात काढून गार करायला ठेवा. 
  4. कोमट झाल्यावर चिरलेला गूळ मिक्स करा. पिठीसाखर घालून नीट मिक्स करा. 
  5. काजूचे तुकडे आणि वेलची पूड घालून मिक्स करा. 
  6. आता मध घालून मिक्स करा आणि हव्या त्या आकाराचे लाडू बनवा. 
  7. जर पीठ सुके झाले असेल आणि लाडू वळता येत नसतील तर एक चमचा तूप घालून मिक्स करा आणि लाडू वाला. एकदम जास्त तूप घालू नका. थोडे थोडे घाला.    
  8. हे लाडू ३-४ आठवडे टिकतात (शिल्लक राहिले तर). 
  9. मध घालायचा नसेल तर तूप आणि साखर पाऊण कप घ्या.  पिठाच्या जाडसर पणावर तुपाचे प्रमाण ठरते. पीठ जाड असेल तर तूप जास्त लागते. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर