मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी भोपळ्याचं भरीत

Photo of Dudhi bhopala(bottle gourd) bharit.. by Ajinkya Shende at BetterButter
1539
6
0.0(0)
0

दुधी भोपळ्याचं भरीत

Apr-18-2018
Ajinkya Shende
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी भोपळ्याचं भरीत कृती बद्दल

अतिशय साधा,करण्यासाठी सोपा आणि चविष्ट पदार्थ..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. अर्धा किलो दुधी भोपळा
  2. २ मध्यम आकारात कापलेले कांदे
  3. २ कमी तिखट हिरव्या मिरच्या
  4. ३-४ पाकळ्या ठेचलेला लसूण
  5. ५-६ पानं कढीपत्ता
  6. पाव चमचा जिरं
  7. पाव चमचा मोहोरी
  8. पाव वाटी शेंगदाणा
  9. पाव चमचा हळद
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. चिमुठभर साखर
  12. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम दुधीची साल काढून मोठ्या तुकड्यांमध्ये कापून कुकरला शिजवून घ्या.(तयारी)
  2. नंतर एका पॅन मधे ३-४ चमचे तेल टाकून तेल तापल्यावर त्यात हिंग,जिरं,मोहिरी,कढीपत्ता,हिरवी मिरची व शेंगदाणे टाकून थोडं परतवून घ्या.
  3. नंतर त्यात कांदा टाकून कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतवून त्यात मीठ व हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  4. ह्यानंतर ह्यात कुकरमधे शिजवलेला दुधी मॅश करून टाका व व्यवस्थित मिक्स करून ५ मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्या.
  5. तयार भरीत सर्विँग बाऊल मधे काढून वरून कोथिंबीर टाकून गरम गरम फुलका किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर