मुख्यपृष्ठ / पाककृती / मैकडोनल्ड स्टाईल फ्रेंच फ्राईज

Photo of MacDonald style french fries by Manasvi Pawar at BetterButter
870
7
0.0(0)
0

मैकडोनल्ड स्टाईल फ्रेंच फ्राईज

Apr-18-2018
Manasvi Pawar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मैकडोनल्ड स्टाईल फ्रेंच फ्राईज कृती बद्दल

आजच मुलीचा हट्ट म्हणून मी ही रेसिपी केली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • साईड डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. चार ते पाच लांबट(जरा उभा आकार असलेले) बटाटे
  2. कोन फ्लोअर
  3. तेल तळण्यासाठी
  4. मीठ चवीनुसार

सूचना

  1. बटाट्याची साले काढून घ्यावीत आणि लांबट आकाराचे काप करून घ्यावेत
  2. ते काप दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावेत
  3. आता एका भांड्यात पाणी घेऊन त्यात बटाट्याचे काप टाकून ते मंद गॅसवर ठेवावे
  4. याला उकळी येऊ द्यायची नाही थोड्या वेळाने त्या पाण्यावर एक पांढरा फेस येईल तेव्हा गैस बंद करावा
  5. आता ते एका चाळणीत काढून पाणी निथळून घ्यावे
  6. नंतर एका स्वच्छ कपड्यावर ते काप सूकवावे
  7. आता कढाईत तेल गरम करावे
  8. एका ताटात ते बटाट्याचे सुकलेले काप घ्यावेत आणि त्याला काॅनऀ फ्लोर व्यवस्थित लावून घ्यावे
  9. आणि मग ते कडकडीत तेलात तळून घ्यावेत
  10. आता सगळ्यात शेवटी last but not list मीठ घालून सगळीकडे पसरवावे
  11. तयार आहेत आपले फ्राईज

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर