मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या शेंगांचे सुप

Photo of Drumstick Soup by Dr.Shubhangi Kumbhar at BetterButter
1132
4
0.0(0)
0

शेवग्याच्या शेंगांचे सुप

Apr-20-2018
Dr.Shubhangi Kumbhar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या शेंगांचे सुप कृती बद्दल

शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच ह्या शेंगांचे सुपही पौष्टिक आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर ठरते. म्हणूनच मुलांच्या हाडांची वाढ सुधारण्यासाठी त्यांच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करा. अशा गुणकारी शेवग्याच्या शेंगांच्या सुपाची ही एक चविष्ट आणि पौष्टिक पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेवग्याच्या शेंगा ४ ते ५
  2. तेल १/२ चमचा, लहान
  3. आलं लसूण पेस्ट १ चमचा, लहान
  4. टोमॅटो १/२, बारीक चिरलेला
  5. कांदा १/२, बारीक चिरलेला
  6. हळद १ चमचा, लहान
  7. मीठ १ चमचा, लहान
  8. काळी मिरी पावडर १ चमचा, लहान
  9. जिरे पावडर १ चमचा, लहान
  10. कोथिंबीर २ चमचे, चिरलेली
  11. मुगडाळ २ चमचे, लहान
  12. हिंग १ चिमुटभर
  13. पाणी २ कप

सूचना

  1. एका कढईत तेल तापवून त्यात कांदा, टोमॅटो, आलं-लसुन पेस्ट, जिरे पुड, काळी मिरी पावडर, मीठ, हिंग,‌हळद, भिजवलेली मुगडाळ घालुन सर्व एकत्रित भाजुन घ्या.
  2. आता वरील मिश्रणात शेवग्याच्या शेंगांचे काप घाला आणि सर्व एकत्रित मिक्स करून घ्यावे.
  3. २ कप पाणी घालून, कढईवर झाकण ठेवून मध्यम आचेवर शेंगा शिजेपर्यंत शिजवुन घ्यावे.
  4. इथे चविष्ट आणि पौष्टिक शेवग्याच्या शेंगांचे सुप तयार झाले, गरम गरम टेस्टी सुप खाण्यास द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर