मटार पनीर | Matar Paneer Recipe in Marathi

प्रेषक Ishika Uppal  |  19th Apr 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Matar Paneer by Ishika Uppal at BetterButter
मटार पनीर by Ishika Uppal
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1067

0

मटार पनीर

मटार पनीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Matar Paneer Recipe in Marathi )

 • 1 टेबल स्पून तेल
 • 2 टेबल स्पून आल्ले लसूण पेस्ट
 • 1/2 कप प्युरी केलेला कांदा
 • 2 पिकलेल्या टोमॅटोची प्युरी + 3-4 हिरव्या मिरच्या
 • 1 टी स्पून वेलदोडा पावडर
 • चवीनुसार मीठ
 • 1/2 टी स्पून हळद पावडर
 • 2 टी स्पून लाल मिरची पावडर
 • 1 टी स्पून गरम मसाला
 • 150 ग्रॅम पनीर
 • 1 कप हिरवे मटार
 • पाणी 1 कप

मटार पनीर | How to make Matar Paneer Recipe in Marathi

 1. प्रेशर कुकरमध्ये तेल व आल्ले लसूण पेस्ट घालावी. थोडा वेळ भाजावे आणि त्यात कांदा व वेलदोडे पावडर मिसळावी.
 2. कांदा सोनेरी तांबूस झाल्यावर त्यात टोमॅटो प्युरी व हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालावी.
 3. आता सर्व मसाले व मीठ घालावे. पॅनमध्ये रस्सा कडेला यायला सुरुवात होईपर्यंत शिजवावे. त्यामध्ये पनीर, मटार घालून ढवळावे.
 4. आता पाणी घालून झाकण लावावे.
 5. 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे आणि आंच बंद करावी.

Reviews for Matar Paneer Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo