मुख्यपृष्ठ / पाककृती / Cheese potato stuffed Capsicum

Photo of Cheese potato stuffed Capsicum by Nayana Palav at BetterButter
916
14
0.0(4)
0

Cheese potato stuffed Capsicum

Apr-21-2018
Nayana Palav
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Cheese potato stuffed Capsicum कृती बद्दल

ही रेसिपी माझे संशोधन आहे, माझा मुलगा भोपळी मिरची खायला बघत नाही. मग त्याला ही मिरची खाऊ घालण्यासाठी मी ही नामी शक्कल लढवली. मिरचीत बटाटयाचे सारण भरले, आणि मधोमध चीज घातले. नंतर ही मिरची बेसनाच्या पिठात घोळवून तळली. वरुन बटाटा वडयासारखी दिसते ही मिरची. चला तर पाहू याची पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे ३ मध्यम
  2. बेसन २०० ग्राम
  3. भोपळी मिरच्या ४-५
  4. मीठ स्वादानुसार
  5. पाणी आवश्यकतेनुसार
  6. हिंग १/४ टीस्पून
  7. हळद १/४ टीस्पून
  8. मोहरी १/४ टीस्पून
  9. जिरे १/४ टीस्पून
  10. कढीपत्ता ७-८ पाने
  11. लसूण ४-५ पाकळया
  12. हिरवी मिरची २-३
  13. कोंथिबीर आवश्यकतेनुसार
  14. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. भोपळी मिरची धूवून, पूसून कोरडी करून बाजूला ठेवा.
  2. बटाटयाची साले काढून बटाटे पाण्यात ठेवा, म्हणजे काळे होणार नाहीत.
  3. बटाटयाच्या फोडी करून पाण्यात ठेवा.
  4. एका कढईत तेल गरम करा.
  5. गरम तेलात हिंग, हळद, मोहरी, जिरे, कढीपत्ता, मिरच्या, लसूण घाला.
  6. आता बटाटे घाला.
  7. नीट परता.
  8. थोडे पाणी घालून शिजू दया.
  9. मीठ, कोंथिबीर घाला.
  10. बटाटे मउ शिजले की चमच्याने स्मॆश करा.
  11. मिश्रण थंड होउ दया.
  12. आता भोपळी मिरची ला खालून कापून आतल्या बिया काढा.
  13. पोकळ भोपळी मिरचीत बटाटयाचे सारण भरा.
  14. नंतर मध्ये चीज चा तुकडा घाला.
  15. वर बटाटयाचे सारण भरा.
  16. आता बेसनात थोडे मीठ, हळद, पाणी घाला.
  17. बेसनाचे घट्ट मिश्रण तयार करा.
  18. बेसनाच्या मिश्रणात भोपळी मिरची बुडवून तळून घ्या.
  19. तयार आहे तुमची चीज बटाटा भरलेली भोपळी मिरची.
  20. गरम गरम चटणी सोबत सव्ह्र करा.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
Apr-28-2018
Mahi Mohan kori   Apr-28-2018

Mast

Chhaya Ainapure
Apr-22-2018
Chhaya Ainapure   Apr-22-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर