मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळा इनोव्हेटिव्ह करंजी

Photo of LAL bhopala  innovative karanji by Chayya Bari at BetterButter
0
9
0(0)
0

लाल भोपळा इनोव्हेटिव्ह करंजी

Apr-22-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळा इनोव्हेटिव्ह करंजी कृती बद्दल

हि माझी इनोव्हेटिव्ह पाककृती आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा किस २वाट्या
  2. साखर १वाटी
  3. खवा १/४वाटी
  4. काजू बदाम थोडे
  5. वेलदोडे जायफळ पावडर १चमचा
  6. कॉर्नफ्लोअर ३चमचे
  7. तूप २चमचे कॉर्नफ्लोअर पेस्ट बनविण्यासाठी
  8. मैदा २.५ वाट्या
  9. खसखस १चमचा
  10. तळण्यासाठी तूप
  11. मीठ किंचित
  12. तेल १चमचा मोहन देण्यासाठी

सूचना

  1. प्रथम भोपळा सोलून ,धुवून ,किसून घ्यावा
  2. मग खवा परतून घ्यावा तसेच १चमचा तुपावर भोपळा किस परतून कोरडा करावा
  3. मग साखर,वेलदोडे पूड ,खवा घालून मिक्स करावे मिश्रण पातळ होईल ते घट्ट होऊ लागले व कडा सोडू लागले की उतरवावे व फ्रिजर मध्ये ठेवावे
  4. आता मैदा चिमुटभर मीठ व १चमचा कडकडीत तेल घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावे
  5. कॉर्नफ्लॉवरमध्ये तूप घालून हाताने फेटून साटा बनवावा
  6. भोपळ्याचे सारण काढून त्यात काजू,बदाम, खसखस घालावी
  7. आता मैद्याच्या समान तीन पोळ्या लाटून प्रत्येकीला एका बाजूला कॉर्नफ्लोअर साटा लावून एकावर एक ठेवून साटाचा भाग वर करून रोल बनवावा व लाट्या कापाव्या
  8. तयार लाटी आडवी ठेवून लाटावी साच्यावर ठेवून सारण भरून कारंजी तयार करावी
  9. याप्रमाणे करंज्या भरून घ्याव्या
  10. तूप तापवून त्यात सोडाव्या पलटी केल्यावर मंद गॅसवर कुरकुरीत तळाव्या करंज्या तयार बासुंदीबरोबर सर्व्ह कराव्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर