मुख्यपृष्ठ / पाककृती / अंड भोपळी कप

Photo of Egg Capsicum Cup by Aarti Nijapkar at BetterButter
324
7
0.0(0)
0

अंड भोपळी कप

Apr-22-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंड भोपळी कप कृती बद्दल

अंड भोपळी कप हा एक आगळं वेगळं प्रयत्न आहे पण खाण्यास अतिचविष्ट यात काही शंका नाही चला तर बघुयात झटपट होणारी आणि पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेलं अंड २ ते ३
  2. भोपळी मिरची बारीक कापलेले १ मध्यम
  3. टोमॅटो बारीक कापलेले १ लहान
  4. लहान ओला कांदा १ लहान
  5. कोथिंबीर चिरलेली १ लहान चमचा
  6. लाल तिखट १ लहान चमचा
  7. गरम मसाला १/४ लहान चमचा
  8. चाट मसाला १/४ लहान चमचा
  9. लिंबाचा रस १/२ लहान चमचा
  10. अंड्याच्या पिवळ्या बलकाचा डिप
  11. पिवळा बलक
  12. फ्रेश क्रीम २ मोठे चमचे
  13. लाल तिखट १/२ लहान चमचा
  14. मीठ चवीनुसार

सूचना

  1. उकडलेले अंडी सोलून घ्या आता त्यांचे बलक काढा
  2. एका तव्यावर थोडंस तेल घाला मग भोपळी मिरची , टोमॅटो , कोथिंबीर, कांदा परतवून घ्या जास्त शिजवायचे नाही आहेत खाताना दाताखाली लागले पाहिजे
  3. आता लाल तिखट , मीठ , गरम मसाला घालून परतवून घ्या व गॅस बंद करा आता लिंबाचा रस व चाट मसाला घालून मिश्रण एकजीव करून घ्या
  4. अंडी घ्या अंड्यांवर किंचित मीठ व चाट मसाला भुरभुरा मग तयार मिश्रण अंड्यांच्या आत घाला सर्व ह्या प्रकारे तयार करून घ्या
  5. भरून झाल्यावर लिंबाचा रस शिंपडा कोथिंबीर ने सजावट करा व गरमागरम मस्त खाण्यास तयार आहे
  6. डिप साठी अंड्याचं पिवळा बलक घ्या त्यात फ्रेश क्रीम , चवीनुसार मीठ , लाल तिखट घाला व चांगलं एकजीव करून घ्या डिप तयार आहे
  7. मस्त स्वादिष्ट डिप तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर