मुख्यपृष्ठ / पाककृती / भोपळ्याचा मालपुआ

Photo of Bhopla Malpua by Swati Kolhe at BetterButter
1275
8
0.0(0)
0

भोपळ्याचा मालपुआ

Apr-22-2018
Swati Kolhe
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भोपळ्याचा मालपुआ कृती बद्दल

मालपुआ हा पदार्थ तसा जुनाच आहे. मालपुआ म्हणजे माल+पुआ माल म्हणजे शिरा आणि पुआ म्हणजे पुरी. आता भोपळ्याचा मालपुआ बद्दल थोडक्यात. माल(शिरा) दुधी भोपळा पासून बनवला आहे. आणि पुआ लाल भोपळापासून. इनोवेशन करून हा मालपुआ तयार केला आहे..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. माल(शिरा) बनवण्यासाठी:
  2. किसलेला दुधी भोपळा १ कप
  3. रवा ४-५ tsp
  4. दूध १ कप
  5. साखर ३/४ कप
  6. तूप २ tbsp
  7. वेलचीपूड १/८ tsp
  8. पुआ(पुरी)बनवण्यासाठी:
  9. वाफवलेले लाल भोपळा १/४ कप
  10. कणिक १/२ कप
  11. मैदा २-३ tbsp
  12. साखर ३-४ tbsp
  13. बडीशेप १ १/२ tsp
  14. सजावटीसाठी:
  15. काजू उभे काप १ tbsp
  16. बदाम उभे काप १ tbsp

सूचना

  1. माल बनवण्यासाठी:
  2. प्रथम कढई मध्ये १ tsp तूप घेऊन त्यावर रवा गुलाबीसर भाजून काढून घ्यावा.
  3. त्याच कढई मध्ये उरलेलं तूप घालून त्यावर दुधी किस घालून दुधी शिजेपर्यंत परतवून घ्यावा.
  4. दुधी शिजला की, त्यात दूध आणि भाजलेला रवा घालून झाकण ठेवून वाफ काढून घ्या.
  5. दूध आटले की, त्यात साखर घालून शिरा बनवून घ्या.
  6. शिरा झाला की, वरून वेलचीपूड घालून छान एकजीव करून घ्या.
  7. पुआ बनवण्यासाठी:
  8. मोठ्या बाउल मध्ये शिजवलेला लाल भोपळा, कणिक, मैदा, साखर, बडीशेप व २ चिमूट मीठ घालून डोसापेक्षा पातळ घोळ बनवून घ्या.
  9. वरील घोळ २० मिनिटसाठी मुरण्यास ठेऊन द्यावे.
  10. २० मिनिटांनंतर कढई मध्ये तेल तापवून, पुआ चे मिश्रण बारीक गॅस(low flame) हळूच चमच्याने ओतावे.
  11. पुआने जाळी धरली की, गॅस मोठा करून बदामी रंगावर तळून घ्यावे.
  12. अश्या प्रकारे सर्व पुआ तळून घ्यावेत.
  13. डिश सजवताना पुआ रचून त्यावर माल म्हणजेच शिरा ठेवावा आणि काजू बदाम चे काप घालून सर्व्ह करावे.
  14. असे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर