मुख्यपृष्ठ / पाककृती / Red Pumpkin and Paneer Kofta Curry

Photo of Red Pumpkin and Paneer Kofta Curry by Nayana Palav at BetterButter
975
18
0.0(6)
0

Red Pumpkin and Paneer Kofta Curry

Apr-22-2018
Nayana Palav
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Red Pumpkin and Paneer Kofta Curry कृती बद्दल

लाल भोपळा आपण सहसा खात नाही. भोपळ्याची भाजी केली तर घरातील कोणीच ती खात नाही. मला एकटीला लाल भोपळ्याची भाजी संपवावी लागते. लाल भोपळा पोष्टीक आहे. त्यात अ जीवनसत्व आहे. मग हा भोपळा घरातल्यांना खाऊ घालण्यासाठी मी एक नामी शक्कल लढवली. मी लाल भोपळ्याचे कोफ्ता केले. कोणालाच कळले नाही की ही भोपळयाची कोफ्ता करी आहे. अशी ही चविष्ट भोपळ्याची कोफ्ता करी कशी बनवतात, ते मी तुम्हाला सांगते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पनीर २०० ग्राम
  2. लाल भोपळा ५०० ग्राम
  3. मीठ स्वादानुसार
  4. बेसन १०० ग्राम
  5. हिरवी मिरची २
  6. आले २ इंच
  7. दही १/२ कप
  8. कोंथिबीर मुठभर
  9. टोमॅटो ३-४
  10. तेल तळण्यासाठी व फोडणीसाठी
  11. जिरं १/४ टीस्पून
  12. हिंग १/४ टीस्पून
  13. हळद १/४ टीस्पून
  14. धणे पूड २ टीस्पून
  15. गरम मसाला १ टीस्पून
  16. लाल मिरची पावडर १ टीस्पून

सूचना

  1. भोपळा स्वच्छ धूवून घ्या.
  2. पनीर किसून घ्या.
  3. भोपळ्याच्या बिया काढून ते सोलून घ्या आणि भोपळ्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्या.
  4. भोपळ्याचे तुकडे किसून घ्या आणि त्यात आले पण किसून घ्या.
  5. हिरव्या मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घ्या आणि किसलेल्या भोपळा आणि आल्याच्या मिश्रणात घाला.
  6. टोमॅटो धुवून घ्या, हिरवी मिरची आणि आले पण धुवून घ्या आणि टोमॅटो बरोबर वाटून घ्या.
  7. आता भोपळ्याच्या मिश्रणात पनीर, मीठ, थोडीशी कोथिंबीर, १/४ छोटा चमचा लाल तिखट, १ छोटा चमचा धने पावडर आणि बेसन घालून एकत्र करा.
  8. आता या मिश्रणाचे गोल कोफ्ते बनवा.
  9. कढईत तेल गरम करून घ्या
  10. तेलात जितके मावतील तितके कोफ्ते घाला.
  11. कोफ्ते उलटून पालटून सर्व बाजूने तळून घ्या.
  12. अशाप्रकारे सर्व कोफ्ते तळून बाजूला ठेवा.
  13. कढईत २ टेबल स्पून तेल टाकून गरम करून घ्या.
  14. गरम तेलात जिरं, हिंग, हळद आणि धने पावडर घालून परतवून घ्या.
  15. आता टोमॅटो-आले-हिरवी मिरचीची पेस्ट घाला आणि मंद आचेवर मसाल्याला तेल सुटे पर्यन्त मसाले परतवून घ्या.
  16. मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात २ टेबल स्पून बेसन घालून परतवा.
  17. आता मसाल्यात घुसळलेले दही घाला आणि ढवळत रहा.
  18. उकळी आल्यावर २ कप पाणी घाला.
  19. आता त्यात मीठ, गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घाला.
  20. झाकण ठेऊन करी उकळू द्या.
  21. तयार कोफ्ते त्यात घाला आणि ३-४ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या.
  22. तयार आहे तुमची चविष्ट भोपळ्याची कोफ्ता करी.
  23. कोफ्त्यावर कोंथिबीर, पनीर किसून घाला.
  24. गरमगरम भोपळ्याचे कोफ्ते पोळी, पराठे, नान, रोटी, भाकरी,भाताबरोबर वाढा.

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
Apr-28-2018
Mahi Mohan kori   Apr-28-2018

Mast

Rama Dolas Khandare
Apr-23-2018
Rama Dolas Khandare   Apr-23-2018

Mast

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर