मुख्यपृष्ठ / पाककृती / मारवाडी पापडाची भाजी

Photo of Marwadi Papad Ki Sabji by Shweta Agrawal at BetterButter
7544
522
4.8(1)
2

मारवाडी पापडाची भाजी

Aug-04-2015
Shweta Agrawal
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • राजस्थान
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 10 पापड
  2. 2 मोठे चमचे तेल
  3. 1 लहान चमचा जिरे
  4. चिमूटभर हिंग
  5. दही अर्धा कप
  6. पाणी दिड कप
  7. धणेपूड 2 मोठे चमचे
  8. बेसन / चण्याच्या डाळीचे पीठ 1 मोठा चमचा
  9. हळद अर्धा लहान चमचा
  10. लाल तिखट चवीनुसार
  11. मीठ चवीनुसार
  12. चिरलेली कोथिंबीर 2 मोठे चमचे
  13. लिंबाचा रस 1 मोठा चमचा

सूचना

  1. तुम्ही पापडाला भाजू/ तळू/ मायक्रोवेव करू शकतात. त्यांचे तुकडे करा आणि बाजूला ठेवा.
  2. एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात जिरे घाला. जिरे तडतडले की हिंग घाला.
  3. त्यादरम्यान, एक कप घ्या आणि अर्धा कप पाण्यात दही मिसळा. त्यात मसाले, धणेपूड, हळद, बेसन, लाल तिखट आणि मीठ घाला. हे साहित्य नीट मिसळा.
  4. आच कमी करून त्यात दह्याचे मिश्रण घाला आणि सतत ढवळत रहा.
  5. पॅनमध्ये सर्व मिसळल्यानंतर आच वाढवून मध्यम करा. याला मिश्रण कमी होईपर्यंत किंवा तेल सोडेपर्यंत शिजवा. नंतर त्यात पापडाचे तुकडे घाला आणि नीट मिसळा.
  6. आता उरलेले पाणी घाला आणि 8-10 मिनिटे शिजू द्या.
  7. याचा स्वाद पहा आणि त्याप्रमाणे त्यात मसाले घाला. जर तुम्हाला आवश्यक वाटले तर त्यात लिंबाचा रस घाला.
  8. कोथिंबीरीने सजवा आणि गरमगरम वाढा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vidya Gurav
Aug-18-2018
Vidya Gurav   Aug-18-2018

Khup chan aahe pn thodya veglya pdhtine bnvli aahe

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर