मावा केक | Mawa Cake Recipe in Marathi

प्रेषक Sanika SN  |  23rd Apr 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Mawa Cake by Sanika SN at BetterButter
मावा केकby Sanika SN
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

18

0

मावा केक recipe

मावा केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mawa Cake Recipe in Marathi )

 • १-१/४ वाटी मैदा
 • १/३ वाटी बटर रूम टेंपरेचरला असलेले
 • १ वाटी साखर
 • १०० ग्राम खवा/ मावा
 • १/३ वाटी दूध
 • २ अंडी रूम टेंपरेचरला असलेली
 • १/२ टीस्पून बेकिंग पावडर
 • १/२ टीस्पून जायफळपूड
 • १ टीस्पून वेलचीपूड
 • १/४ टीस्पून मीठ
 • काजू -बदाम वरून लावण्यासाठी

मावा केक | How to make Mawa Cake Recipe in Marathi

 1. अव्हन १८० डीग्री. सें वर प्री-हिट करायला ठेवावा.
 2. मिक्सिंग बोलमध्ये साखर, बटर व खवा एकत्र करून क्रिमी व हलके होईपर्यंत फेटावे.
 3. एकावेळी एक अंडे त्यात फोडून मिश्रण फेटावे.
 4. आता त्यात चाळून घेतलेला मैदा, मीठ, बेकिंग पावडर, जायफळपूड  वेलचीपूड थोडे थोडे करून घालावे.
 5. त्यात थोडे थोडे करुन दूध घालावे व फेटावे.सर्व जिन्नस एकत्रनीट फेटले गेले पाहिजेत.
 6. केक-टीनला बटरपेपर लावून घ्यावा व त्यात तयार मिश्रण ओतावे.
 7. वरुन काजू-बदाम लावावे व अव्हनमध्ये ५० मिनिटे बेक होण्यासाठी ठेवावे.
 8. विणायची सुई किंवा स्क्युअर टोचून केक चांगला बेक झालाय का ते पहावे.
 9. केक संपूर्ण थंड झाल्यावर तुकडे करावे.

Reviews for Mawa Cake Recipe in Marathi (0)