BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी मलई पनीर

Photo of Methi Malai Paneer by Sanika SN at BetterButter
1
6
0(0)
0

मेथी मलई पनीर

Apr-23-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी मलई पनीर कृती बद्दल

मुलायम, क्रिमी, रेस्टाॅरंट स्टाईल पनीर - मेथी ग्रेव्ही

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • पंजाबी
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. १ जूडी मेथी, पाने खुडून, स्वच्छ धुवून घ्यावी.
  2. २०० ग्राम पनीरचे तुकडे
  3. १ छोटा कांदा बारीक चिरून
  4. १ टोमॅटो बारीक चिरून
  5. १ वाटी फ्रेश क्रीम (ग्रेव्ही कितपत दाट-पातळ हवे त्याप्रमाणे)
  6. २-३ लसूण पाकळ्या 
  7. पेरभर आले बारीक चिरलेले
  8. २-३ हिरव्या मिरच्या
  9. १ टेस्पून भिजवलेले काजू
  10. १ टेस्पून कसूरीमेथी
  11. २ मसाला वेलदोडे
  12. १/२ टीस्पून जीरे
  13. ३/४ टीस्पून गरम-मसाला
  14. मीठ चवीप्रमाणे

सूचना

  1. स्वच्छ धुवून घेतलेली मेथी बारीक चिरून घ्यावी.
  2. मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो, आले. लसूण, काजू व हिरव्या मिरच्या एकत्र करुन, किंचित पाणी घालून मुलायम वाटून घेणे.
  3. कढईत तेल गरम करुन जीरे व मसाला वेलदोडे घालून परतणे.
  4. त्यात वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
  5. आता त्यात बारीक चिरलेली मेथी, मीठ, गरम-मसाला घालून खमंग परतणे.
  6. कसूरीमेथी थोडी चुरडून घालावी व पनीर घालून एकत्र करावे.
  7. अगदी थोडेच पाणी घालून, झाकून वाफ काढावी.
  8. त्यात आता क्रीम घालाव, झाकून ३-४ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे.
  9. कोळश्याचा तुकडा विस्तवावर गरम करायला ठेवा.
  10. कोळसा चांगला तापला की एका वाटीत काढून ती वाटी तयार ग्रेव्हीत ठेवावी. 
  11. वरून तेल किंवा तूप सोडून झाकण घट्ट लावावे.
  12. स्मोक्ड फ्लेव्हर संपूर्ण ग्रेव्हीला लागला पाहिजे.
  13. चपाती, फुलके, पराठे, रोटी किंवा नानबरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर