Photo of Milk Veg Curry by Nayana Palav at BetterButter
932
16
0.0(4)
0

Milk Veg Curry

Apr-24-2018
Nayana Palav
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Milk Veg Curry कृती बद्दल

ही रेसिपी माझे संशोधन आहे. वेगवेगळ्या भाज्यांमध्ये दूध घालून ही आमटी केली आहे. कांदा आणि भाज्यांमूळे एक वेगळाच रीच स्वाद या आमटीला आलाय. ही आमटी चपाती, भाताबरोबर खूप छान लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • स्टर फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. दूध २५० मिलीलिटर
  2. ब्रोकोली १००-१५० ग्राम
  3. फरसबी १०० ग्राम
  4. बेबी कॉर्न १०० ग्राम
  5. मटार एक छोटा वाडगा
  6. लाल भोपळी मिरची १/२
  7. काश्मीरी मिरची पावडर १ टेबलस्पून
  8. तेल १-२ टेबलस्पून
  9. कांदा १
  10. हिंग १/४ टीस्पून
  11. हळद १/४ टीस्पून
  12. मोहरी १/४ टीस्पून
  13. जिरे १/४ टीस्पून
  14. कढीपत्ता ४-६ पाने
  15. आलं १ टीस्पून ठेचून
  16. लसूण १ टीस्पून ठेचून
  17. पार्सली आवश्यकतेनुसार

सूचना

  1. प्रथम भाज्या धूवून, कापून घ्या.
  2. एक कढई गरम करत‌ ठेवा, त्यात तेल घाला.
  3. आता कढईत, हिंग, हळद, मोहरी, जिरं, कढीपत्त्याची फोडणी करून घ्या.
  4. आता कापलेला कांदा घाला, आल, लसूण घाला.
  5. ब्रोकोली घाला, नीट परतून घ्या.
  6. आता कापलेल्या भाज्या घालून नीट परतून घ्या.
  7. झाकण ठेवून भाज्या, शिजवून घ्या
  8. गरज वाटल्यास थोडे पाणी घाला.
  9. आता मिरची पावडर घाला.
  10. नीट मिक्स करा.
  11. आता दूध घाला.
  12. २ मिनिटे शिजू द्या.
  13. कापलेली पार्सली घाला.
  14. तुमची अनोख्या चवीची दूध आमटी तयार आहे.
  15. मीठ घालू नका, नाहीतर दूध फाटेल.
  16. आमटी वाढताना, मीठ बरोबर द्या.
  17. ही आमटी चपाती, भाताबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
May-03-2018
Mahi Mohan kori   May-03-2018

Khuach masttt....

Narendra Palav
May-03-2018
Narendra Palav   May-03-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर