BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ग्रिल्ड तंदूरी कोळंबी

Photo of Grilled Tandoori Kolambi by Reena Andavarapu at BetterButter
801
8
0(0)
0

ग्रिल्ड तंदूरी कोळंबी

Apr-25-2018
Reena Andavarapu
60 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ग्रिल्ड तंदूरी कोळंबी कृती बद्दल

पाणी काढलेला दही किंवा हंग कर्ड़ तंदूरी कोळंबी बनवण्यासाठी महत्वाचा घटक आहे. दही बरोबर सर्व मसाला कोळंबीला लावून मुरवत ठेवण्यात येते. मुरलेली कोळंबी ग्रिल करून पूदीना कोतमीरच्या दही बरोबर केलेल्या चटनी सह सर्व करण्यात येते. अगदी सोपे अणि शिज़वन्यासाठी कमी वेळ लागतो. पार्टी स्टार्टर किंवा स्नैक्स आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा.

रेसपी टैग

 • फेस्टिव्ह फन
 • नॉन व्हेज
 • सोपी
 • किटी पार्टी
 • इंडियन
 • ग्रीलिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 10

 1. जम्बो कोळंबी - १ केजी
 2. लिंबू - १
 3. कोथिंबीर - गार्निश साठी बारीक चिरलेला
 4. मारीनेशनसाठी :
 5. हंग कर्ड़ - ३ /४ कप
 6. आले लेसुन पेस्ट - २ छोटा चमचा
 7. लाळ तिखट - २ छोटा चमचा
 8. गरम मसाला पाउडर - १ छोटा चमचा
 9. तंदूरी मसाला - २ छोटा चमचा (ऑप्शनल)
 10. जीरा पाउडर - १ छोटा चमचा
 11. मीठ चविनुसार
 12. तेल - २ मोठा चमचा
 13. हीरवी दही चटनी साठी :
 14. कोथिंबीर - १ कप
 15. पुदीना - १ /२ कप
 16. हीरवी मिरची - २
 17. दही - १ कप
 18. मीठ चविनुसार

सूचना

 1. कोळंबी मधून नस काढून स्वच्छ करा.
 2. त्यात हंग कर्ड़ अणि सर्व मारीनेशन साठी मसाले घालून टाका.
 3. मिक्स करावे अणि किमान १ तास फ्रीज मध्ये ठेवावे. जास्त वेळ पण ठेवू शकतो.
 4. बांबू स्कूवर १५ मिनट पाण्यात भिजवून ठेवावे मग त्यात कोळंबी ट्रेड करावे.
 5. ग्रिल किंवा बारबेक़ुए ग्रिल वर तेल लावून फ्राई करावे. एका बाजूला दहा मिनट फ्राई करून दुसर्‍या बाजूला पलटून घ्यावे. पालटून तेल वरुन घालावे.
 6. शिजविण्यासाठी १५ ते २० मिनिटांच्या आत पूर्णपणे ग्रिल होत अणि रसदार पण असते.
 7. हिरवी चटनी साठी दही सोडून सगळे सामग्री थोडा पानी घालून मिक्सी करा. ही चटनी दही मध्ये घालून व्हिस्क / मिक्स करा.
 8. ग्रिल केलेल्या कोळंबीवर लिंबू अणि चिरलेला कोथिंबीर घालून हिरवी दही चटनी बरोबर सर्व करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर