Photo of Pizza flowers in Aappe pan by Nayana Palav at BetterButter
635
24
0.0(7)
0

Pizza flowers in Aappe pan

Apr-26-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Pizza flowers in Aappe pan कृती बद्दल

माझ्या मुलाला सतत नवीन पदार्थ हवे असतात खायला. आता नवीन काय बनवावे या विचारात असताना हा पदार्थ सुचला. ओव्हन चा मोल्ड शोधायचा पण कंटाळा आला होता, मग काय आप्पे पन घेतले. फ्रिज उघडला तर भाज्या, चीज घरात होते. चटकन होणारा आणि पौष्टीक आहे हा पदार्थ. चीज मध्ये क आहे. भाज्या पण पौष्टीक आहेत. चला तर पाहू याची पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • ग्रीलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ब्रेड स्लाईस ७
  2. टोमॅटो १ बारीक कापलेला
  3. भोपळी मिरची १ बारीक कापलेली
  4. कांदा १ बारीक कापलेला
  5. आल लसूण पेस्ट १ टेबलस्पून
  6. ब्रोकोली १/२ वाडगा बारीक कापलेली
  7. मटार १/४ कप
  8. मक्याचे दाणे १/४ कप
  9. हिरवी मिरची २
  10. मीठ चवीनुसार
  11. टोमॅटो साॅस किंवा पास्ता साॅस २ टेबलस्पून
  12. एक स्टीलची वाटी ब्रेड स्लाइस कापण्यासाठी
  13. पिझ्झा चीज किंवा मोझरेला चीज ४ क्यूब्ज
  14. तेल किंवा लोणी आवश्यकतेनुसार
  15. पार्सली सजविण्यासाठी

सूचना

  1. प्रथम मक्याचे दाणे, मटार ब्रोकोली थोडया पाण्यात वाफवून घ्या.
  2. एक फ्रायिंग पॅन गरम करत ठेवा.
  3. त्यात तेल किंवा लोणी घाला, कांदा, हिरवी मिरची, आल लसूण पेस्ट घाला.
  4. जरा परतून घ्या
  5. आता कापलेल्या, वाफवलेल्या भाज्या घाला.
  6. साॅस घाला, मीठ घाला.
  7. चीज घाला.
  8. नीट परतून घ्या
  9. आता ब्रेडचे स्लाइस वाटीने गोल आकारात कापून घ्या.
  10. आप्पे पॅन ला थोडे लोणी लावून घ्या.
  11. ब्रेडचा स्लाइस ला लोणी लावा.
  12. ब्रेडचा स्लाइस पॅन च्या खड्डयात दाबून घाला.
  13. शिजवलेले भाजीचे मिश्रण स्लाइस मध्ये भरा.
  14. वर चीज किसून घाला.
  15. असे सर्व स्लाइस करा.
  16. तव्यावर झाकण ठेवून चीज वितळेपर्यंत शिजू द्या.
  17. तयार आहे तुमचे पिझ्झा फ्लाॅवरस्, टोमॅटो, पार्सलीने सजवा.

रिव्यूज (7)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Narendra Palav
May-03-2018
Narendra Palav   May-03-2018

Wow

Mahi Mohan kori
Apr-28-2018
Mahi Mohan kori   Apr-28-2018

Wow...... Yummy......:yum::yum::yum::yum:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर