Photo of Strawberry Basundi Faluda by Nayana Palav at BetterButter
888
15
0.0(7)
0

Strawberry Basundi Faluda

Apr-29-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Strawberry Basundi Faluda कृती बद्दल

रखरखीत उन्हाळयात काहीतरी थंड खावेसे वाटते. लहान मुलांच्या शाळांना सुट्टया चालू आहेत. मुले खेळून येतात, आई तहान लागली असे म्हणतात. अशा वेळी त्यांची तहान भागेल व पोट भरेल असा पदार्थ म्हणजे फालुदा. दुधात कॆल्शियम व प्रथिन आहेत. हा फालुदा खुप पौष्टीक आहे. चला तर पाहू याची पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फ्युजन
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दूध १ लिटर
  2. साखर आवश्यकतेनुसार
  3. स्ट्राॅबेरी १०
  4. आंबा १
  5. फालुदा शेव ५० ग्राम
  6. सब्जा २ टेबलस्पून
  7. सुका मेवा (काजू, बदाम पिस्ता)
  8. चेरी सजवण्यासाठी

सूचना

  1. प्रथम सब्जा भिजत ठेवा.
  2. अर्धा लिटर दूध साखर घालून आटत ठेवा.
  3. स्ट्राॅबेरी चा पल्प करा.
  4. फालुदा शेव पाण्यात घालून शिजत ठेवा, त्यात स्ट्राॅबेरी चा पल्प टाका.
  5. शेवया गुलाबी होतील.
  6. बदाम, पिस्ता, काजू बारीक कापून घ्या.
  7. आंब्याचा पण पल्प करा.
  8. आता उरलेल्या दूधात साखर घालून विरघळून घ्या.
  9. त्यात व्हॅनिला इसेन्स घाला.
  10. एका ग्लासात साखर, इसेन्स घातलेले दूध ओता.
  11. शेव, आंब्याचा पल्प, गुलाबी शेवया, सब्जा घाला.
  12. वर आटवलेले दूध (बांसुदी) घाला.
  13. वर कापलेला सुका मेवा घाला.
  14. तयार आहे चविष्ट फालुदा.
  15. फ्रिजमध्ये ठेवून थंड सर्व्ह करा.

रिव्यूज (7)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
May-03-2018
Mahi Mohan kori   May-03-2018

Mastch....

Narendra Palav
May-03-2018
Narendra Palav   May-03-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर