मुख्यपृष्ठ / पाककृती / रेड रोज गुलाबजामुन

Photo of Red Rose Gulabjamun by sharwari vyavhare at BetterButter
457
17
0.0(0)
0

रेड रोज गुलाबजामुन

Apr-29-2018
sharwari vyavhare
15 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेड रोज गुलाबजामुन कृती बद्दल

गुलाबजामुन चे आपण काला जामुन , ड्राय गुलाबजामुन हे प्रकार आपण पहातोय, पण हा एक वेगळा प्रकार मी बनविण्याचा प्रयत्न केला आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. ताजा खवा २५० ग्राम
  2. मैदा ३० ग्राम
  3. रवा २० ग्राम
  4. साखर २ कप
  5. पाणी २ ते ४ कप
  6. रेड रोज इसेन्स २ चमचे
  7. रोज कलर १ चमचा
  8. तुप तळण्यासाठी
  9. दुध १ / २ कप
  10. सोडा चिमुटभर

सूचना

  1. खवा , मैदा, रवा आणि सोडा एकत्र करून निट मळुन मऊ करा.
  2. आवश्यक वाटल्यास दुध घालू शकता .
  3. मिश्रण १५ ते २० मि झाकुण ठेवून द्या.
  4. एका भांड्यात साखर आणि पाणी घ्या.
  5. साधारणता साखरेच्या वर थोडे पाणी आले पाहिजे.
  6. साखर विरघळली की १ / २ कप दुध टाका .
  7. व मळी काढून घ्या.
  8. एकतारी पेक्षा थोडा कमी म्हणजे तार तुटली पाहीजे असा पाक करून घ्या .
  9. आता पाकात थोडा इसेन्स घाला.
  10. पाक झाला का नाही हे पाहण्यासाठी पाक थोडा प्लेट मध्ये घ्या .
  11. थंड झाल्यावरच तपासून पहा.
  12. खव्याचे मिश्रण घ्या.
  13. १/ ३ भागात रेड रोज इन्सेस आणि रोज कलर घाला.
  14. याचे छोटे गोळ बनवा .
  15. पांढऱ्या ही भागाचे थोडे मोठ्या आकाराचे गोळे बनून घ्या.
  16. दुसऱ्या पांढऱ्या भागाचा गोळा घ्या.
  17. त्याची वाटी बणवून घ्या .
  18. पांढऱ्या गोळ्याच्या वाटी मध्ये रेड रंग चा गोळा ठेवून घ्या.
  19. वाटी बंद करून त्याला गोल आकार दया .
  20. अशा प्रकारे सर्व गुलाबजामुन करून घ्या.
  21. एका कढई तुप घ्या.
  22. तुप जास्त गरम करू नका.
  23. मंद गॉस वर गुलाबजामुन तळून घ्या.
  24. गुलाबजाम तळले की लगेच गरम पाकात टाका .
  25. अशा प्रकारे सर्व गुलाबजामुन करून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर