Photo of Chilly Paneer Dry by Nayana Palav at BetterButter
714
15
0.0(4)
0

Chilly Paneer Dry

May-01-2018
Nayana Palav
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Chilly Paneer Dry कृती बद्दल

चिली पनीर ही डिश सगळ्यांची आवडती डिश आहे. पनीरच्या गोड डिश खाऊन कंटाळा आला असेल, तर ही डिश नक्की ट्राय करा. पनीर मध्ये प्रथिन आहेत. यातील रंगीत भोपळी मिरची मुळे ही डिश आकर्षक दिसते. चला तर पाहू याची पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर ४०० ग्रॅम
  2. कांदा १ कप
  3. लाल भोपळी मिरची १
  4. पिवळी भोपळी मिरची १
  5. हिरवी भोपळी मिरची १
  6. हिरव्या मिरच्या ४ उभ्या चिरून
  7. लसूण पाकळ्या ६-७ चिरून
  8. आल लसूण पेस्ट १ टेबलस्पून
  9. डार्क सोया सोस १/४ कप
  10. मिरपूड २ टीस्पून
  11. कॉर्नफ्लोर २ टेबलस्पून
  12. मैदा २ टेबलस्पून
  13. तेल फोडणीसाठी व तळणयासाठी

सूचना

  1. पनीरचे चौकोनी लांब तुकडे करा.
  2. कॉर्नफ्लोर आणि मैदया मध्ये २ चिमुट मीठ घाला.
  3. १/२ टीस्पून मिरपूड त्यात १/२ कप पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा. 
  4. पनीरचे तुकडे त्यात घोळवून तेलात तळून घ्या.
  5. सर्व तुकडे तळून घ्या.
  6. कांदा, भोपळी मिरची चे मोठे मोठे चौकोनी कापून तुकडे करा.
  7. कढईत २ टेबलस्पून तेल गरम करा आणि त्यात लसूण फोडणीला घाला.
  8. लसूण परता आणि लगेच हिरवी मिरची घालून परता.
  9. कांदा घालून परता.
  10. आल लसूण पेस्ट, भोपळी मिरची घालून परता.
  11. २ टेबलस्पून सोया सॉस, मीठ,मिरपूड घाला.
  12. भाज्या ३-४ मिनिटे परतून घ्या.
  13. भोपळी मिरची अर्धवट शिजे पर्यंत परता.
  14. पनीरचे तुकडे घालून परता.
  15. उरलेल्या कॉर्नफ्लोरमध्ये १/२ कप पाणी,  ४-घालून मिश्रण एकजीव करा. आणि उकळायला ठेवा. उकळी आली कि सॉस जाडसर  होऊ लागेल. एकीकडे सतत ढवळत रहा. सॉस जाड झाला कि पनीर आणि भाज्यांवर ओता.वरून कांद्याची पात घाला आणि एकदा परतून लगेच Serve करा.
  16. हे पाणी भाजीत ओता.
  17. सॉस जाडसर  होऊ लागेल. एकीकडे सतत ढवळत रहा.
  18. एकीकडे सतत ढवळत रहा.
  19. चविष्ट गुठळया पडता कामा नये.
  20. तयार आहे तुमचे चविष्ट चिली पनीर.
  21. गरम गरम चपाती, रोटी, नान, पराठा बरोबर छान लागते.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
May-03-2018
Mahi Mohan kori   May-03-2018

Mastttttt....

Narendra Palav
May-03-2018
Narendra Palav   May-03-2018

Excellent

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर