मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर व्हेज ग्रिल्ड सँडविच

Photo of Paneer veg grild sandvich by Sheetal Kamath at BetterButter
1202
6
0.0(0)
0

पनीर व्हेज ग्रिल्ड सँडविच

May-02-2018
Sheetal Kamath
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर व्हेज ग्रिल्ड सँडविच कृती बद्दल

Crispy and spicy paneer veg grild sandvich

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • ग्रीलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो पनीर,अर्धा इंचाचे तुकडे करून
  2. 1 कांदा उभा पातळ चिरून
  3. 1 सिमला मिरची उभी चिरून
  4. 1 चमचा बारीक चिरलेली लसूण
  5. 1 चमचा बारीक चिरलेले आले
  6. 2 चमचे टोमॅटो सॉस
  7. 1 चमचा सोया सॉस
  8. 1 चमचा व्हिनेगर
  9. 1 छोटा चमचा मीठ
  10. 1 चमचा मिरची पावडर
  11. अर्धा चमचा हळद
  12. सँडविच ब्रेड 8 स्लाइस
  13. सर्व्हीगसाठी आवडीप्रमाणे टोमॅटो सॉस आणि मेयोनीज

सूचना

  1. सँडविच चे सारण/ भाजी बनवण्यासाठी
  2. कढईत तेल घ्यावे व त्यात चिरलेले आले-लसूण घालून परतावे.नंतर त्यात चिरलेला कांदा व सिमला मिरची घालून 3-4 मिनिटे परतून घ्यावे.
  3. आता यात मीठ,मिरची पावडर, हळद,टोमॅटो सॉस,सोया सॉस,व्हिनेगर घालून 1 मिनिटभर परतावे.
  4. पनीर चे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करावे व 2 मिनिटे झाकण लावून एक वाफ येऊ द्यावी.
  5. नंतर गॅस बंद करून मिश्रण थोडे थंड होण्यास ठेऊन द्यावे .
  6. आता सँडविच ब्रेडचा एक स्लाइस घेऊन त्यावर वरील तयार भाजी पसरावी व त्यावर ब्रेडचा दुसरा स्लाइस ठेवावा आणि ते ग्रील्ड तव्यावर किंवा सँडविच टोस्टर मध्ये भाजून घ्यावे
  7. आवडीप्रमाणे टोमॅटो सॉस आणि मेयोनीज बरोबर खायला द्यावे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर