मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला चहा कुल्फी

Photo of Masala tea kulfi by Ajinkya Shende at BetterButter
1253
10
0.0(0)
0

मसाला चहा कुल्फी

May-03-2018
Ajinkya Shende
5 मिनिटे
तयारीची वेळ
390 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला चहा कुल्फी कृती बद्दल

मलई कुल्फी,केशर पिस्ता कुल्फी,बदाम कुल्फी अशा अनेक कुल्फी व्हरायटी बाजारात उपलब्ध आहेत,परंतु चहा फ्लेवर ची कुल्फी कदाचित बाजार उपलब्ध नसेल किंवा क्वचितच कुठेतरी उपलब्ध असेल.ही चहा फ्लेवर कुल्फी चवीला खूप मस्त लागते.एरवी आपण दुधाचा चहा हा गरमचं पितो पण चहाच्या फ्लेवर ची ही कुल्फी खायला तेवढीचं मजा येते....

रेसपी टैग

  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. ४ कप फुल क्रीम दूध
  2. ४ चमचे चहा पावडर
  3. चहा मसाल्यासाठी ४-५ वेलची,छोटा सुंठाचा तुकडा,अगदी छोटा दालचिनी तुकडा,१ काळीमिरी,१ लवंग,थोडं किसलेलं जायफळ
  4. १ वाटी कंडेन्सड मिल्क
  5. १ १/२ चमचा व्हॅनिला फ्लेवर्ड कस्टर्ड पावडर

सूचना

  1. प्रथम एका पॅन मधे दूध टाकून दूध उकळत ठेवावे.
  2. दुधाला एक उकळी आल्यानंतर त्यात चहा पावडर आणि चहा मसाल्यासाठीचं सर्व साहित्य कुटून दुधात टाकावं व २ मिनिट उकळवून दूध गाळून घ्यावं.
  3. नंतर एका दुसऱ्या पॅन मधे तयार चहा,साखर आणि कंडेन्सड मिल्क टाकून ५-७ मिनिट चहा उकळवून घ्यावा.
  4. नंतर एका बाऊल मधे कस्टर्ड पावडर घेऊन त्यात थोडं दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं व हळू हळू चहात टाकावं व टाकताना सतत ढवळत राहावं जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
  5. कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर दूध लगेचं घट्ट होईल,दूध घट्ट झाल्यावर आच मध्यम करून २ मिनिट उकळवून गॅस बंद करावा व हे कुल्फीचं मिश्रण थंड होऊ द्यावं.
  6. हे मिश्रण थंड झाल्यावर कुल्फी मोल्ड मधे भरून ५-६ तास सेट होण्यासाठी फ्रीजर मधे ठेवावं.
  7. ५-६ तासानंतर कुल्फी व्यवस्थित सेट झाल्यावर तयार कुल्फीमधे कुल्फीची काडी टाकून थंडगार मसाला चहा कुल्फी सर्व करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर