Photo of Shaan -E- Mangolla by Shradha Uttekar at BetterButter
562
10
0.0(2)
0

Shaan -E- Mangolla

May-03-2018
Shradha Uttekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • फ्युजन
  • बॉइलिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. रसगुल्ले बनविण्यासाठी -
  2. 1 लिटर दूध
  3. 1 लिंबाचा रस
  4. 2 कप साखर
  5. 3 कप पाणी
  6. आंब्याचा रस बनविण्यासाठी -
  7. 2 हापूस आंबे
  8. 2 चमचे साखर
  9. 1 छोटी वाटी दूध
  10. सजावटीसाठी काजू आणि पिस्ता

सूचना

  1. हापूस आंबे स्वच्छ धूवून घ्यावेत
  2. मिक्सरमध्ये साखर आणि दूध टाकून आंब्याचा मस्त रस करून फ्रिजमध्ये गार करण्यासाठी ठेवावा
  3. रसगुल्ले बनविण्यासाठी दूध उकळून घ्यावे व त्यामध्ये लिंबाचा रस टाकून पनीर तयार करावे
  4. तयार केलेले पनीर 10 मिनिटं छानपैकी ताटामध्ये एकजीव मळावे
  5. नंतर गॅसवर मोठ्या भांड्यामध्ये साखर आणि पाणी घेऊन साखर विरघळेपर्यंत पाक उकळून घ्यावा. (इथे तुम्ही आंब्याचा इसेन्स सुद्धा टाकू शकता परंतु मी इसेन्स वापरत नाही)
  6. उकळत्या पाकामध्ये पनीरचे छोटे-छोटे गोळे करून टाकावे व पंधरा मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यावे
  7. तयार झालेले रसगुल्ले थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये घेऊन त्यावर थंड करून ठेवलेला आमरस टाकावा आणि काजू-पिस्ताने सजवून आपला शान -ए- मॅगोला थंड थंड वाढावा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Prashant Pawar
May-03-2018
Prashant Pawar   May-03-2018

Best

Priyanka Fuge
May-03-2018
Priyanka Fuge   May-03-2018

Tasty n delicious

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर