Photo of Paneer Stuffed Bhajani Vade by Nayana Palav at BetterButter
954
16
0.0(5)
0

Paneer Stuffed Bhajani Vade

May-03-2018
Nayana Palav
360 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Paneer Stuffed Bhajani Vade कृती बद्दल

आपण भाजणीचे वडे नेहमी करतो, आणि चिकन आमटी बरोबर खातो. नुसता वडा खायला पण छान लागतो. काहीजण हे वडे चहा बरोबर खातात. म्हणून मी यात पनीर भरले आणि वडे बनवले. घरात सगळ्यांना आवडले. चला तर पाहू याची पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. तांदूळ १ किलो
  2. चणा डाळ २०० ग्राम
  3. उडीद डाळ २०० ग्राम
  4. गहू १ वाटी
  5. ज्वारी १/४ किलो
  6. धणे १०० ग्राम
  7. जिरे २ चमचे
  8. कोंथिबीर आवश्यकतेनुसार
  9. लाल तिखट १ टीस्पून (आवश्यकतेनुसार)
  10. हिंग १ चिमूटभर
  11. १/४ टीस्पून हळद
  12. तेल १ टेबलस्पून मोहनासाठी
  13. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. तांदूळ, ज्वारी, डाळी, गहू, धणे, जिरे वेगवेगळे भाजून, दळून आणा.
  2. या भाजणीतील ४-५ कप पीठ घ्या.
  3. त्यात हिंग, हळद, लाल तिखट, कोंथिबीर कापून घाला.
  4. कोमट पाणी घालून, पीठ घट्ट मळून घ्या.
  5. हे पीठ एका डब्यात घालून, झाकण लावून ६ तास ठेवून द्या.
  6. पीठ फुगून येते, मग हे मळून घ्या.
  7. एक प्लास्टीक पेपर स्वच्छ धुवून पुसून घ्या.
  8. आता कढईत तेल गरम करा.
  9. पोळपाटावर प्लास्टीक पेपर ठेवा.
  10. पिठाचा गोळा घेऊन त्याला खोलगट वाटीचा आकार दर्या.
  11. आता पिठाचा गोळा घेऊन त्यात पनीर भरा.
  12. गोळा बंद करून हाताला पाणी लावून वडा थापा.
  13. गरम तेलात तळून घ्या.
  14. एका बाजूने भाजले की दुसऱ्या बाजूने पण तळा.
  15. तयार आहे तुमचे चविष्ट पनीर स्टफ्ड वडे.
  16. चहा, साॅस बरोॆबर सर्व्ह करा.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
May-08-2018
Mahi Mohan kori   May-08-2018

Superb....

Narendra Palav
May-06-2018
Narendra Palav   May-06-2018

Excellent

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर