मुख्यपृष्ठ / पाककृती / अळकुडीचे पॅटिस - अरबी पॅटिस

Photo of Arbi Pattice - Taro root croquette by Sudha Kunkalienkar at BetterButter
991
3
0.0(0)
0

अळकुडीचे पॅटिस - अरबी पॅटिस

May-04-2018
Sudha Kunkalienkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळकुडीचे पॅटिस - अरबी पॅटिस कृती बद्दल

आपण अळकुडी नेहमी शिजवून  खातो .कधी कधी भाजीही बनवतो. मी अळकुडीचे पॅटिस बनवले. खूप टेस्टी झाले. तुम्हीही करून बघा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अळकुडी / अरबी १०-१२ मध्यम
  2. साबुदाणा पीठ १ कप
  3. कोकम ४-५
  4. खवलेला नारळ १ कप
  5. चिरलेली कोथिंबीर २ चमचे
  6. मिरची ठेचून अर्धा चमचा
  7. साखर १ चमचा
  8. तीळ १ मोठा चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल / तूप तळण्यासाठी

सूचना

  1. अळकुडी धुवून कोकम, मीठ घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. अळकुडीत पाणी घालू नका.
  2. गार झाल्यावर सोलून मॅश करा आणि साबुदाणा पीठ घालून मध्यम पीठ भिजवून घ्या. लागल्यास थोडं तेल घाला.
  3. सारणासाठी तीळ भाजून जाडसर कुटून घ्या.
  4. नारळ, कोथिंबीर, तीळ, साखर, मिरची,मीठ एकत्र करा. सारण तयार झाले.
  5. पिठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून त्यात चमचाभर सारण भरून गोळा नीट बंद करा.
  6. एका कढईत तेल / तूप गरम करून त्यात हे पॅटिस मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या.
  7. गरमागरम पॅटिस चटणी / सॉस बरोबर सर्व्ह करा. मी घरी बनवलेल्या स्वीट चिली सॉस बरोबर सर्व्ह केलं आहे पॅटिस.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर