मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर पराठा

Photo of PANEER paratha by Chayya Bari at BetterButter
1193
8
0.0(0)
0

पनीर पराठा

May-04-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर पराठा कृती बद्दल

अतिशय पौष्टीक व बच्चे मंडळींची आवडती पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कुस्करलेला पनीर १.५वाटी
  2. सिमला मिरची बारीक चिरलेली१/२वाटी
  3. टोमॅटो बारीक चिरलेला १/२वाटी
  4. कांदा बारीक चिरलेला १वाटी
  5. कोथिंबीर बारीक चिरलेली १/४वाटी
  6. तिखट २चमचे
  7. मीठ चवीनुसार
  8. हळद १/२चमचा
  9. आले लसूण पेस्ट १चमचा
  10. कणिक २वाट्या
  11. मैदा १वाटी
  12. तेल मोहन २चमचे
  13. पराठा शेकण्यास व स्टफिंग परतण्यास बटर १/४वाटी

सूचना

  1. तयारीत सिमला मिरची,कांदा, टोमॅटो ,कोथिंबीर कापून घ्यावी
  2. कणिक,मैदा एकत्र करून मीठ व कडकडीत तेलाचे मोहन देऊन मध्यम भिजवावी व झाकून ठेवावे
  3. १चमचा बटर टाकून कांदा, सिमला मिरची,टोमॅटो टाकून परतावे मग मीठ,तिखट ,हळद व कुस्करलेला पनीर व कोथिंबीर घालून मिक्स करावे व उतरून घ्यावे स्टफिंग तयार
  4. आता पिठाचा योग्य प्रमाणात गोळा घेऊन त्यात पनीरचे स्टफिंग भरावे
  5. व बंद करून पराठा लाटून गरम तव्यावर टाकावा दोन्ही बाजूने बटर सोडून खरपूस भाजावा
  6. तयार पराठा दह्याबरोबर सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर