मुख्यपृष्ठ / पाककृती / दिल्ली स्टाईल पनीर भुर्जी

Photo of Delhi Style Paneer Bhurji by Ajinkya Shende at BetterButter
1278
5
0.0(0)
0

दिल्ली स्टाईल पनीर भुर्जी

May-05-2018
Ajinkya Shende
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दिल्ली स्टाईल पनीर भुर्जी कृती बद्दल

पनीर हा खूप प्रोटीन रीच पदार्थ आहे,पनीर च्या बऱ्याचं डीशेस रेस्टॉरंटमधे मिळतात आणि पनीरचे चाहते असलेल्या खवय्यांसाठी पनीर भुर्जी म्हणजे आवडता मेनू आणि त्यातल्या त्यात दिल्ली स्टाईल पनीर भुर्जी म्हणजे लाजवाब...शाकाहारींसाठी पनीर म्हणजे प्रोटीन चा सर्वात चांगला स्रोत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पाव किलो ताजं सॉफ्ट पनीर
  2. ३ बारीक कापलेले कांदे
  3. २ छोटे बारीक चिरलेले टोमॅटो
  4. २ चमचे बटर
  5. २ चमचे तेल
  6. अर्धा चमचा जिरं
  7. चिमूठभर हिंग
  8. १ इंच आल्याचे उभे पातळ काप(जिंजर ज्युलिअन्स)
  9. अर्धा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची
  10. अर्धा चमचा लाल मिरची पावडर
  11. अर्धा चमचा धणा जीरा पावडर
  12. पाव चमचा हळद
  13. अर्धा चमचा गरम मसाला
  14. चवीप्रमाणे मीठ
  15. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम एका पॅन मधे तेल आणि बटर टाकून तेल व बटर व्यवस्थित तापल्यावर त्यात जिरं,आल्याचे पातळ उभे काप आणि हिरवी मिरची टाकून थोडं परतवून घ्यावं.
  2. नंतर त्यात कांदा टाकून कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतवून घ्यावा.
  3. नंतर त्यात टोमॅटो टाकून टोमॅटो थोडे शिजत आल्यावर त्यात गरम मसाला सोडून सर्व मसाले टाकून मसाले थोडे परतवून घ्यावे व त्यात साधारण दीड वाटी पाणी टाकून एक उकळी येऊ द्यावी.
  4. पाण्याला उकळी आल्यावर त्यात पनीर हाताने कुस्करून टाकावं.
  5. नंतर ह्यात चवीप्रमाणे मीठ,गरम मसाला आणि कोथिंबीर टाकून भुर्जी व्यवस्थित मिक्स करून २ मिनिट शिजवून घ्यावी.
  6. तयार भुर्जी सर्विंग प्लेट मधे काढून वरून आल्याचे काप,हिरव्या मिरचीचे पातळ काप व कोथिंबीर टाकून गार्निश करावी व गरम पराठ्यासोबत सर्व करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर