Photo of Cheese Utappa by Nayana Palav at BetterButter
966
11
0.0(1)
0

Cheese Utappa

May-06-2018
Nayana Palav
960 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Cheese Utappa कृती बद्दल

उत्तप्पा केला तर कोणी आवडीने खायला बघत नाही. त्याच उत्तप्प्याला पिझ्झा चे रुप दिले तर तो पिझ्झा आवडीने खाल्ला जातो. उत्तप्यावर वेगवेगळया भाज्या घातल्या व वर भरपूर चीज घातले, कोणाला कळले पण नाही की हा उत्तप्पा आहे. पिझ्झा समजून सगळयांनी फस्त केला. चला तर पाहब याची पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. उकडा किंवा साधा तांदूळ दीड कप
  2. उडीद डाळ १/२ कप
  3. पोहे १/४ कप
  4. मीठ चवीनुसार
  5. पाणी आवश्यकतेनुसार
  6. भोपळी मिरची १
  7. कांदा १
  8. चेरी टोमॅटो ७-८
  9. काळे ऑलिव्हज्
  10. चीज क्यूब्ज ६

सूचना

  1. तांदूळ, उडीद डाळ, पोहे स्वच्छ धुवून घ्या.
  2. वेगवेगळे भिजत घाला.
  3. पोहे पण भिजत घाला.
  4. उडीद डाळ मिक्सरला पाणी घालून वाटून घ्या.
  5. आता तांदूळ व पोहे मिक्सरला पाणी घालून वाटून घ्या.
  6. डाळ व तांदळाचे मिश्रण एकत्र करुन, आंबवण्यासाठी रात्रभर ठेवा.
  7. सकाळी या मिश्रणात मीठ घाला.
  8. तवा गरम करून त्यात तेल घालून चमच्याने मिश्रण घाला.
  9. या उत्तप्यावर कापलेल्या भाज्या घाला.
  10. एका बाजूने उत्तप्पा शिजला की पलटा.
  11. दुसरी बाजू पण भाजून घ्या.
  12. आता यावर चीज किसून घाला.
  13. आता काळे ऑलिव्हज् घाला.
  14. तयार आहे चीज उत्तप्पा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Narendra Palav
May-06-2018
Narendra Palav   May-06-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर