Photo of Cinnamon Caramel Custerd by Aarti Nijapkar at BetterButter
1210
7
0.0(1)
0

Cinnamon Caramel Custerd

May-06-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • व्हिस्कीन्ग
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कोमट दूध २ १/२ कप
  2. साखर १/२ वाटी
  3. अंडी ३
  4. अंड्याचं पिवळं बलक १
  5. वेनीला इसेन्स १ लहान चमचा
  6. दालचिनी पावडर २ मोठा चमचा
  7. साखर १/४ कप कॅरॅमल साठी

सूचना

  1. ओव्हन १८०* से वर गरम करत ठेवा कस्टर्ड मोल्ड खाली राहील एवढा दुसरा ट्रे घ्या व त्यात पाणी घालून ठेवा
  2. सर्वप्रथम आपण कॅरॅमल बनवून घेऊ कस्टर्ड साठी मोल्ड घ्या स्वछ पुसून बाजूला ठेवून द्या
  3. आता गॅस वर नॉनस्टिक पॅन तापवत ठेवा मग साखर घालून मंद आचेवर सतत परतवत रहा साखर विरघळेपर्यंत ढवळत रहा आता साखर पूर्णपणे विरघळली तर गॅस बंद करा
  4. कस्टर्ड चं मोल्ड घ्या त्यात गरम कॅरॅमल घाला व सर्वत्र पसरवून घ्या चमच्याने किंवा होताने नाही तर मोल्ड गोलाकार मध्ये फिरवत राहा (स्वतःची व हाता बोटांची काळजी घ्यावी कारण गरम कॅरॅमल फार वाईट असते चटका लागतो चामडी निघून येते)
  5. एका भांड्यात दूध घ्या त्यात साखर घालून विरघळवून घ्या
  6. आता अंडी व वेनीला इसेन्स घालून व्हिस्क ने एकाच दिशेने व्हिस्क करून घ्या दूध आणि अंडी एकजीव झाले त्यात दालचिनी पावडर घाला व पुन्हा एकजीव करून घ्या
  7. तयार मिश्रण दुसऱ्या भांड्यात गाळून घ्या
  8. आता कॅरॅमल केलेल्या मोल्ड मध्ये दूध अंड्याचं मिश्रण घाला
  9. ओव्हन मध्ये असलेल्या पाण्याच्या ट्रे मध्ये हा मोल्ड ठेवून ध्या
  10. १८०*से ३० ते ३५ मिनिटे डबल बॉयलिंग बेक करून घ्या
  11. वूड पीक किंवा केक टेस्टर ने कस्टर्ड झाले का बघा झाल्यावर पाण्याचा ट्रे मधून कस्टर्ड मोल्ड अलगद काढा व बाजूला ठेवा
  12. आता गरमागरम दालचिनी कॅरॅमल कस्टर्ड तयार आहे हे कसेही सर्व करा गरम किंवा गार छानच लागते

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
May-06-2018
Nayana Palav   May-06-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर