BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Chilli Rose Panacotta

Photo of Chilli Rose Panacotta by Aarti Nijapkar at BetterButter
0
6
5(1)
0

Chilli Rose Panacotta

May-06-2018
Aarti Nijapkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Chilli Rose Panacotta कृती बद्दल

पॅनाकोटा हा मूळात इटली ह्या प्रांतातील आहे...सर्वांचा आवडता डेजर्ट आहे शिवाय ह्यात दूध व क्रीम असल्यामुळे हे पौष्टिक आहे, ह्याच्यात आपण अनेक चव पाहिल्या किंवा खाल्ल्या आहेत, आज आपण जरा वेगळी चव चाखून बघुयात तर चिली आणि रोझ ह्यांच मिश्रण करून पॅनाकोटा बनऊयात...घाबरू नका हा प्रयोग घरच्यांवर झाला आहे सर्वाना आवडलाही... तुम्हाला ही नक्की आवडेल

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • इटालियन
 • बॉइलिंग
 • डेजर्ट
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

 1. दूध २०० मिली
 2. डबल क्रीम ४०० मिली
 3. साखर १२० ग्रॅम
 4. वेनीला इसेन्स १ लहान चमचा
 5. जिलेटीन १ मोठा चमचा
 6. रोझ सिरप १/३ वाटी
 7. टबास्को सॉस (मिरची सॉस) १ लहान चमचा
 8. मीठ अगदी किंचित
 9. पुदिना पाने सजावटीसाठी
 10. रोझ सिरप सजावटीसाठी

सूचना

 1. सर्व प्रथम जिलेटीन पाण्यात मिसळून ठेवा
 2. आता एका सॉसपन मध्ये दूध आणि डबल क्रीम साखर आणि एकत्र करून घ्या
 3. गॅस वर सॉसपॅन ठेवा व मंद आचेवर दुधाचं मिश्रण गरम करा सतत ढवळत राहा उकळी येऊ देऊ नये व सॉसपॅन ला चिकटू नये ह्याची काळजी घ्यावी
 4. साखर विरघळेपर्यंत ढवळत रहा ह्या सर्व कृती मंद आचेवरच करायच्या आहेत
 5. आता पाण्यात भिजवलेले जिलेटीन मधले पाणी काढा आणि जिलेटीन दुधात घालून एकत्र करून घ्या
 6. मंद आचेवर जिलेटीन विरघळेपर्यंत ढवळत रहा जिलेटीन पूर्णपणे विरघळले की गॅस बंद करा
 7. कोमट करत ठेवा कोमट झाले की त्यात वेनीला इसेन्स आणि टबास्को थेंब व किंचित मीठ घाला व मिश्रण एकत्र करून घ्या
 8. गार झालेले पॅनाकोटाचे मिश्रण घालून घ्या
 9. पॅनाकोटासाठी घेतलेले मोल्ड किंवा डेजर्ट ग्लास घ्या त्यात खाली रोझ सिरप घाला व फ्रीजर मध्ये सेट करून घ्या
 10. आता तयार पॅनाकोटाचे मिश्रण मोल्ड किंवा ग्लास मध्ये घालून फ्रीजर मध्ये सेट करून २ ते ३ तास
 11. पॅनाकोटा तयार झाले की सजावट करून थंडगार सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Narendra
May-06-2018
Nayana Narendra   May-06-2018

Excellent

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर