तवा पुलाव | Tava pulav Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  8th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Tava pulav by Manasvi Pawar at BetterButter
तवा पुलावby Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

तवा पुलाव recipe

तवा पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tava pulav Recipe in Marathi )

 • एक मोठा वाडगा शिजवलेला भात
 • जीर एक चमचा
 • कांदे दोन बारीक चिरून
 • एक वाटी ताजा मटार
 • दीड चमचा आल लसूण पेस्ट
 • चार टोमॅटो बारीक चिरून
 • एक वाटी शिमला मिरची बारीक चिरून
 • दोन बटाटे उकडून चिरून
 • पावभाजी मसाला दोन मोठे चमचे
 • लाल तिखट एक चमचा
 • मीठ चवीनुसार
 • एका लिंबाचा रस
 • १/२ वाटी कोथिंबीर
 • १/२ चमचा हळद
 • चार मोठे चमचे तेल

तवा पुलाव | How to make Tava pulav Recipe in Marathi

 1. भांड गरम करत ठेवावे.तेल गरम झाले की त्यात जीरे घालावे
 2. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा
 3. नंतर मटार घालून व्यवस्थित परतावे
 4. एक वाफ येऊ द्यावी आता टोमॅटो घालून परतून घ्या
 5. टोमॅटो चांगला शिजला की त्यात शिमला मिरची घालावी
 6. हळद लाल तिखट मीठ घालून पुन्हा एक वाफ काढावी
 7. पाव भाजी मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून बटाटे घालून एक वाफ काढावी
 8. आता यामध्ये शिजवलेला भात घालून व्यवस्थित मिक्स करून त्यात कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून एक वाफ काढून गॅस बंद करावा

My Tip:

तुम्ही यामध्ये थोडा गरम मसाला पण घालू शकता

Reviews for Tava pulav Recipe in Marathi (0)