ढोकळा | Dhokla Recipe in Marathi

प्रेषक Anvita Amit  |  8th May 2018  |  
5 from 4 reviews Rate It!
 • Dhokla recipe in Marathi,ढोकळा, Anvita Amit
ढोकळाby Anvita Amit
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

5

4

ढोकळा recipe

ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhokla Recipe in Marathi )

 • दोन वाटी बेसन
 • तेल
 • मीठ, साखर
 • छोटा अर्धा चमचा हळद
 • आलं लसूण मिरचीची पेस्ट अर्धा चमचा
 • पाणी आवश्यकतेनुसार
 • ओले खोबरे आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी
 • एक लिंबू
 • दोन चिमूटभर सोडा
 • दीड पॅकेट साधा फ्लेव्हर Eno
 • राई ,कढीपत्ता, दोन तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या

ढोकळा | How to make Dhokla Recipe in Marathi

 1. ज्या पातेल्यात तुम्हांला ढोकळा बनवायचा असेल त्या पातेल्यात दोन वाटी बेसन घ्या
 2. त्यात दोन मोठे चमचे तेल घाला
 3. चवीप्रमाणे मीठ घाला
 4. दीड चमचा साखर घाला
 5. आलं लसूण मिरची पेस्ट अर्धा जमचा घाला
 6. अर्ध्या छोटा चमचा हळद घाला
 7. एक लिंबाचा रस पिळून घाला
 8. चांगले मिक्स करुन घ्या एकही गुठळी राहता कामा नये
 9. आता या मिश्रणात दोन चिमूटभर सोडा दीड पॅकेट eno घालून पटकन फेटून घ्या
 10. एक कुकर घ्या त्यामध्ये खाली तळाशी पाणी ठेवा मिश्रण तयार केलेले भांडे कुकरमध्ये ठेवा वरून झाकण लावून शिटी काढून घ्या आणि वीस मिनिटं फास्ट गॅस करून ढोकळा शिजू द्या
 11. आता कुकर थंड झाल्यावर ढोकळा काढून घ्या आणि थंड होऊ द्या
 12. आता एक फोडणी पात्र घ्या त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घाला तेल गरम होऊ द्या
 13. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये राई कढीपत्ता व चिरलेल्या मिरच्या घाला
 14. २ चमचे साखर घाला
 15. एक पेला पाणी घाला व साखर वितळे पर्यंत पाणी उकळू द्या
 16. आता ही फोडणी थंड झालेल्या ढोकळ्यां वरती घाला
 17. वरून ओले खोबरे आणि कोथिंबीर टाकून गार्निशिंग करा
 18. अशाप्रकारे तयार आहे तुमचा खमंग ढोकळा

My Tip:

मी यात आला लसूण मिरचीची पेस्ट घातली आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर ती नाही घातली तरी चालते.

Reviews for Dhokla Recipe in Marathi (4)

Nayana Palav6 months ago

Superb
Reply
Anvita Amit
6 months ago
thanks tai

Mahi Mohan kori6 months ago

Chan
Reply
Anvita Amit
6 months ago
thanks

samina shaikh6 months ago

yummy yummy..
Reply
Anvita Amit
6 months ago
thanks sam

deepali oak6 months ago

Yammy
Reply
Anvita Amit
6 months ago
thanks tai:kissing_heart: