दम आलू | DUM AALU Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  8th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of DUM AALU by जयश्री भवाळकर at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

दम आलू recipe

दम आलू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make DUM AALU Recipe in Marathi )

 • 250 ग्राम छोटे बटाटे
 • 1 मध्यम आकाराचा कांदा
 • 3-4कळ्या लसूण
 • 1छोटा तुकडा अदरक
 • 1 छोटी हिरवी मिरची
 • 2चमचे काजू
 • 1चमचा मगज करी
 • 1 चमचा पांढरे तीळ
 • 1चिमूट हळद
 • 1/2 चमचा लाल तिखट
 • 1/4चमचा काश्मिरी मिरची पावडर
 • 1 चमचा धणे पावडर
 • 1/4 चमचा गरम मसाला
 • 1/2 चमचा कसुरी मेथी
 • 1छोटा तुकडा रतनजोत (लाल रंगा साठी)
 • 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ
 • तेल बटाटे तळायला आणि फोडणी साठी

दम आलू | How to make DUM AALU Recipe in Marathi

 1. सर्व प्रथम बटाटे धुवून कुकर मध्ये 3 शिट्टी देऊन उकळून घ्या.
 2. . हे बटाटे सोलून घ्या.
 3. तेला त थोडे लालसर तळून घ्या.
 4. आता कांदा, लसूण,मिर्ची आणि अदरक चे वाटण करा.
 5. काजू ,मगज आणि तिळाचे वाटण वेगळे करा.
 6. आता पॅन मध्ये 2 चमचे तेल घाला ,गरम करा.त्यात कांदा लसूण वाल वाटण नीट परतून घ्या.
 7. आता ह्याच्यात काजू मगज च वाटण घालून तेल सुटे पर्यंत नीट परतून घ्या.
 8. आता ह्यात सगळे रुटीन चे मसाले आणि रतनजोत घाला आणि परतुन घ्या आणि तळलेले बटाटे घाला.
 9. आता थोडं पाणी घाला आणि रस्सा हवा तसा पातळ करून एक उकळी येऊ द्या.
 10. सर्वीग डिश मध्ये गरमा गरम दम आलू कोथिंबीर च्या पानांनी सजवून सर्व्ह करा.

My Tip:

अजून रिच ग्रेव्ही हवी असेल तर थोडी फ्रेश क्रिम नी सजवून डिश सर्व्ह करावी.

Reviews for DUM AALU Recipe in Marathi (0)