सातपुडच्या पाडोळ्या | Satpudchya patolya Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  9th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Satpudchya patolya recipe in Marathi,सातपुडच्या पाडोळ्या, Teesha Vanikar
सातपुडच्या पाडोळ्याby Teesha Vanikar
 • तयारी साठी वेळ

  45

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

0

सातपुडच्या पाडोळ्या recipe

सातपुडच्या पाडोळ्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Satpudchya patolya Recipe in Marathi )

 • 1 वाटी बेसन
 • 4 चमचे गव्हाचे पिठ
 • सुक्क खोबरं किसलेले 1वाटी
 • कांदा ऊभा बारीक कापलेला
 • 2चमचे खसखस
 • 1चमचा तिळ
 • 2चमचे लाल तिखट
 • 1चमचा खान्देशी मसाला किवां गरम मसाला
 • हळद
 • आलं लसुण पेस्ट 1 चमचा
 • मीठ
 • कोथिम्बीर

सातपुडच्या पाडोळ्या | How to make Satpudchya patolya Recipe in Marathi

 1. सारण बनवण्यासाठी-
 2. कांदा तेल टाकुन ब्राऊन होईपर्यन्त भाजुन घ्या व प्लेट मध्ये काढुन घ्या
 3. खोबरं ही गुलाबी होईपर्यन्त भाजुन घ्या,
 4. तीळ व खसखस ही भाजुन घ्या व प्लेटमध्ये काढुन घ्या
 5. आता कढईत तेल घाला जीरे घालुन भाजलेले मसाले घाला.
 6. मसाला नीट परतुन त्यात आलं लसुण पेस्ट ,तिखट.गरम मसाला हळद,मीठ व1/2 कप पाणी टाकुन मसाला शिजवुन घ्या
 7. मसाला शिजल्यावर कोथिंम्बीर टाकुन गँस बंद करावा
 8. नाँनस्टीक कढईत 2चमचे तेल टाका जीरे घाला 1/2 चमचा आलं लसुण पेस्ट घालुन 1/2 चमचा तिखट,हळद मीठ घालुन पिठाच्या दुप्पट पाणी घाला.
 9. बेसन व गव्हाचे पीठ ऐकत्र करुन घ्या
 10. पाण्याला ऊकळी आली की बेसन हळुहळु त्यात टाकुन पीठ चागंले घोटुन घ्या
 11. ऐक ही गुठळी न रहाता घोटुन 2मी. पीठ वाफवुन घ्या
 12. प्लास्टीकच्या कडक पिशवीवर थोडं तेल टाकुन 1डाव गरम पीठ त्यावर टाकून वरून पुन्हा पिशवी ठेवुन चागंले स्मँश करुन घ्या
 13. स्मँश झाल्यावर गोळा ऐकत्र करुन दोन ही प्लास्टीकच्या पिशवी मध्ये ठेवुन हलक्या हाताने लाटुन घ्या
 14. लाटुन झालेल्या बेसनाच्या पोळीवर तयार सारण ऐकसमान स्प्रेड करा व पोळी हळुहळु रोल करुन सुरीने वड्या कापुन घ्या
 15. ह्याच प्रमाणे सर्व वड्या करुन सर्व्हिगं प्लेटमध्ये ठेवुन वरुन कोथिम्बीर घालुन सर्व्ह करा

My Tip:

पीठ गरम अतानांच वड्या कराव्या,नाही तर थंड झाल्यावर बेसनाची पोळी तुटते व वड्या जमत नाहीत.

Reviews for Satpudchya patolya Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo