मँगो जेली(व्हेज) | Mango jelly Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  9th May 2018  |  
5 from 3 reviews Rate It!
  • Mango jelly recipe in Marathi,मँगो जेली(व्हेज), Nayana Palav
मँगो जेली(व्हेज)by Nayana Palav
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

3

मँगो जेली(व्हेज) recipe

मँगो जेली(व्हेज) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango jelly Recipe in Marathi )

  • आंबे पिकलेले ४
  • साखर १/२ किंवा आवश्यकतेनुसार
  • अगर अगर (चायना ग्रास) १० ग्राम
  • पाणी २ कप
  • लिंबूरस १ टेबलस्पून

मँगो जेली(व्हेज) | How to make Mango jelly Recipe in Marathi

  1. अगर अगर १/२ कप पाण्यात १० मिनिटे भिजवा.
  2. आता दीड कप पाणी गरम करा.
  3. त्यात अगर अगर घाला.
  4. अगर अगर पूर्ण विरघळले की चहाच्या गाळणीने गाळून घ्या.
  5. काही आंबे स्कूप करा.
  6. बाजूला ठेवा.
  7. आंबे सोलून त्याचे क्यूबज् करा.
  8. काही क्यूबज् सजावटीसाठी बाजूला ठेवा.
  9. आंब्याच्या फोडी ब्लेंडर ने ब्लेंड करा.
  10. आता एक भांडे गॅसवर ठेवा.
  11. त्यात अगर अगर चे मिश्रण, साखर, आंब्याची प्युरी, लिंबूरस घाला.
  12. सतत ढवळत रहा.
  13. आता हे मिश्रण जरा थंड झाले की स्कूप केलेल्या अांब्यात घाला.
  14. आता आंब्याचे तुकडे घाला.
  15. हे आंबे ग्लासवर ठेवा.
  16. आता हे आंबे फ्रिजमध्ये ठेवा.
  17. जेली सेट व थंड झाल्यावर सर्व्ह करा.

Reviews for Mango jelly Recipe in Marathi (3)

Varsha Shendge6 months ago

Wow
Reply

deepali oak6 months ago

Mast
Reply

Anvita Amit6 months ago

awesome
Reply