रवा ढोकळा | Instant rava dhokla Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  11th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Instant rava dhokla recipe in Marathi,रवा ढोकळा, Manasvi Pawar
रवा ढोकळाby Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

रवा ढोकळा recipe

रवा ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant rava dhokla Recipe in Marathi )

 • एक वाटी रवा
 • एक वाटी आंबट ताक
 • आल लसूण मिरची पेस्ट दीड चमचा
 • मीठ चवीनुसार
 • सोडा /इनो एक चमचा
 • जीर मोहरी हिंग कढीपत्ता फोडणीसाठी
 • तेल फोडणीसाठी
 • एक दोन चमचे साखर
 • १/२ वाटी पाणी
 • हळद पाव चमचा

रवा ढोकळा | How to make Instant rava dhokla Recipe in Marathi

 1. रव्यामध्ये ताक आलं लसूण मिरची पेस्ट आणि मीठ व हळद घालून एकजीव करून घ्यावे
 2. दुसरीकडे ढोकळा शिजवण्यासाठी भांड्यात पाणी गरम करत ठेवावे
 3. आता ढोकळ्याच्या मिश्रणात ईनो किंवा सोडा घालून थोडे फिरवावे
 4. आता एका भांड्याला थोडं तेल लावून ढोकळ्याच मिश्रण यात घालून १५ मिनिटे वाफवून घ्यावे
 5. एका भांड्यात १/२ वाटी पाणी आणि २ चमचे साखर घालून थोडे उकळून घ्यावे
 6. ढोकळा शिजून झाला की त्याला थोडं थंड होऊ द्या
 7. आता या ढोकळ्याला काप दर्या आणि तयार केलेला साखर सिरप आपल्याला जेवढं गोड हवं त्याप्रमाणात घाला
 8. आता ढोकळ्याला मोहरी जिरे हिंग व कढीपत्ता घालून फोडणी दर्या व सर्व करा

My Tip:

यामध्ये मी साखर सिरप वापरला आहे पण मिश्रणात साखर घालून ही आपण हा ढोकळा करू शकतो

Reviews for Instant rava dhokla Recipe in Marathi (0)