चटपटीत चिवडा | Chatpatit chivda Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  12th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chatpatit chivda recipe in Marathi,चटपटीत चिवडा, Teesha Vanikar
चटपटीत चिवडाby Teesha Vanikar
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

2

0

चटपटीत चिवडा recipe

चटपटीत चिवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chatpatit chivda Recipe in Marathi )

 • 1/2कि. पातळ पोहे
 • 1वाटी शेंगदाणे
 • 1वाटी तेल
 • 1 सुक्या खोबर्याची वाटी
 • 1वाटी नमकिन बुंदी
 • पाव कि बारीक पिवळी शेव
 • कढीपत्ता
 • 1चमचा हळद
 • 7हिरव्या मिरच्या
 • 12लसुण पाकळ्या
 • 1चमचा पिठी साखर
 • 1चमचा काळे मिठ
 • मीठ
 • आवडीनुसार जीरे राई

चटपटीत चिवडा | How to make Chatpatit chivda Recipe in Marathi

 1. पोहे साफ करुन खरपुस भाजुन घ्या व मोठ्या परातीत काढुन घ्या
 2. खोबर्याचे चीप्स काढुन घ्या
 3. मिर्च्या व लसुणाचे बारीक तुकडे करुन घ्या
 4. आता कढईत तेल घाला व गरम करून घ्या
 5. तेलात प्रथम शेंगदाणे तळुन घ्या व पोह्यांवर घाला
 6. ह्याचप्रमाणे खोबंर,लसुण कढीपत्ता व मिरच्या ही तळुन घेऊन पोह्यांवर घाला
 7. शेवटी जीरे राई घालुन त्यातच हळद टाकुन ही फोडणी पोह्यांवर घाला
 8. मीठ.काळे मीठ व साखर ही घाला
 9. दोन मोठ्या चपट्या चमच्यांनी पोहे हलक्या हाताने खाली वर करुन मिक्स करा
 10. आता बारीक शेव व बुंदी घालुन पुन्हा ऐकत्र मिक्स करा
 11. आता तयार चिवडा ऐअर टाईट कंन्टेनर मध्ये भरून पाहीजे तेव्हा खा

My Tip:

पातळ पोहे 2दिवस ऊन्हात ठेऊन मगच चिवडा करायला घ्यावा,यामुळे चिवडा कुरकुरीत होतो

Reviews for Chatpatit chivda Recipe in Marathi (0)