मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट बर्फी

Photo of Coconut Barfi by Sanjula Thangkhiew at BetterButter
3623
309
4.5(0)
0

कोकोनट बर्फी

Jul-07-2015
Sanjula Thangkhiew
0 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोनट बर्फी कृती बद्दल

एक पारंपारिक मिठाई जी खोबरे आणि कंडेन्स्ड मिल्कने बनविली जाते.

रेसपी टैग

  • साऊथ इंडियन
  • सौटेइंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी किसलेले खोबरे (गोड न केलेले)
  2. 3/4 कप दूध
  3. 3/4 कप गोड कंडेन्स्ड मिल्क
  4. 1/2 लहान चमचा वेलदोड्याची पूड
  5. 1 लहान चमचा साखर
  6. 2-3 लहान चमचा तूप
  7. खाण्याचा गुलाबी रंग

सूचना

  1. दूध कोमट करा. दूध आणि किसलेले खोबरे एकत्र करा. एक तासासाठी बाजूला ठेवा.
  2. एका कढईत तूप गरम करा. दुधात भिजवलेले खोबरे त्यात घाला आणि 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर शिजवा.
  3. आता त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून 5 मिनिटे हलवा.
  4. साखर आणि वेलदोड्याची पूड घाला. हलवा आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
  5. जोपर्यंत तूप कडा सोडायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत मंद आचेवर 20 ते 25 मिनिटे हलवा.
  6. अर्धा कप कोकोनट बर्फी सोडून बाकीचे एका तेलकट केलेल्या ताटात ओता आणि 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा.
  7. काढून ठेवलेल्या अर्धा कप बर्फीत खाण्याचा गुलाबी रंग नीट मिसळा. नंतर फ्रीज केलेल्या बर्फीवर एक पातळ थर पसरा. नंतर खोबऱ्याचा कीस त्यावर शिंपडून 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
  8. कोकोनट बर्फीला चौरस कापा आणि वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर